माझा विजय निश्चित झाला - संजय शिरसाट:म्हणाले - मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण जनतेने कौल दिला
3 hours ago
1
विधानसभा निवडणुकीचा निकालाचे कल समोर येत आहेत. महाराष्ट्राता महायुतीने बहुमतापेक्षाही जास्त आकडा पार केल्याचे पहायला मिळत आहे. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा विजय निश्चित झाल्याचे संजय शिरसाट म्हणाले. तसेच मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावाही त्यांनी केला. मी विजयाच्या उंबरठ्यावर नाही, तर माझा विजय निश्चित झाला आहे. जनतेने मला जो कौल दिला, यामुळे मी ऋणी आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रत्येकाने मला वेगवेगळ्या अँगनले बदनाम करण्याचा प्रयत्न केला. नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. माझी एमआयएमशी थेट लढत होती. एमआयएमला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा होता. ते ठाकरे गटाचे नाही, तर एमआयएमचे उमदेवार होते. पण जनतेने त्यांना नाकारले. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उबाठा गटाला एकही जागा मिळणार नाही, असे चित्र दिसत आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. मुख्यमंत्री आमचाच होणार! मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना मुख्यमंत्री आमचाच असेल, असे विधान संजय शिरसाट यांनी केले. एकनाथ शिंदे हेच व्हावेत, असे मला आजही वाटते. जनतेने त्यांना कौल दिला आहे. त्यांचा चेहरा घेऊनच आम्ही पुढे आलो आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी मनोमन इच्छा आहे. पण याचा निर्णय आज रात्री वरिष्ठ घेतील, असेही शिरसाट म्हणाले. काम आणि जनतेचा विश्वासावर हे यश मिळाले
सुपडा साफ होणार म्हणणाऱ्यांचा सुपडा साफ झाला आहे. भविष्यकर्त्यांचे भविष्य खोटे निघले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हतो. आमचे काम आणि जनतेचा विश्वास या जोरावर हे यश मिळाले आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटलांचे सर्व कार्यकर्ते महायुतीसोबत
जरांगे फॅक्टर चालला की नाही, यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, जरांगे पाटील यांनी याच्याबरोबर जा, किंवा त्याच्याबरोबर जा, असा आदेश कुणालाही दिला नव्हता. जो तुम्हाला चांगला वाटेल त्याच्या मागे उभे रहा, असे मनोज जरांगे यांनी सांगितले होते. त्याच पद्धतीने जरांगे पाटलांचे सर्व कार्यकर्ते महायुतीसोबत उभे राहिले, त्यामुळे महायुती आघाडीने पुढे आलेली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)