ड्रायफ्रूट्स मध्ये सुपरफूड म्हणून अंजीरला ओळखले जाते.अंजीर हे फळ म्हणून कोणत्याही स्वरूपात सुकवता येते बहुतेक लोक ओल्या पेक्षा सुके अंजीर पसंत करतात. अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे होतात मात्र सुके अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात. पचनासाठी आणि पोटासाठी अंजीर चांगले असतात जेव्हा तुम्ही अंजिराचा रस पिता तेव्हा ते मधासारखे बनते आणि तुमच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते.
अंजीरामुळे ऍसिडिटी, सूज आणि बद्धकोष्ठता दूर होते त्यासोबतच शरीराला शक्ती देते. अशक्तपणा असल्यास दररोज भिजवलेल्या अंजीराचे सेवन केल्याने फायदे होतो. बद्धकोष्ठते पासून आराम हवा असल्यास अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्याने आराम मिळतो. पाण्यात भिजवलेला अंजिरांचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो. पोट साफ करण्यास आणि वजन कमी करण्याचे काम जे फायबर करतात ते अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात असतात.
मधुमेह रुग्णही अंजीर खाऊ शकतात अंजीर भिजवून खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हाडे मजबूत करण्यासाठी दिवसातून दोन अंजीर भिजवून खावे. पीसीओडी असलेल्या महिला आणि गर्भवती महिलांसाठी भिजवलेले अंजीर वरदानापेक्षा कमी नाहीयेत. अंजिराचे जास्त फायदे हवे असतील तर अंजीर रात्रभर साध्या पाण्यात भिजत ठेवा आणि उरलेले पाणी सकाळी अंजीर खाण्यापूर्वी प्या.
अंजीरचा रसामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजासत्ता त्यामुळे गॅसची आम्लता कमी होते अंजिराचा रस पचन क्रिया शांत करण्यास मदत करतो. आतड्यांसाठी भिजवलेले अंजीर आणि त्याचा रस चांगला असतो एक चतुर्थांचं अंजीर देखील वजन कमी करण्यास मदत करतो हे सिद्ध झाले तसेच त्वचेचा आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणावापासून आराम देण्यासाठी देखील अंजीर फायदेशीर आहे.
अंजीर हे अतिशय गोड आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट आहे पण याचे फायदे अनेक आहेत त्याचबरोबर अति प्रमाणात खाल्ल्याने ते हानिकारक देखील ठरू शकते. दररोज दोन ते तीन पेक्षा जास्त अंजीर न खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.