मानहानी खटल्यात कारावास; राऊतांनी लगेच घेतला जामीन:सोमय्यांच्या पत्नीवर केला हाेता 100 काेटींचा आराेप

2 hours ago 1
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत यांना महानगर दंडाधिकारी (शिवरी कोर्ट) यांनी दोषी ठरवले. तसेच १५ दिवसांची कारावासाची शिक्षा व २५ हजार दंड ठोठावला. मात्र राऊत यांच्या अर्जाचा विचार करून त्यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ३० दिवसांच्या आत अपिलाची मुभाही कोर्टाने त्यांना दिली आहे. २०२२ मध्ये मीरा-भाईंदर मनपाचे १६ शौचालय बांधण्याचे कंत्राट मेधा यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते. त्या वेळी बनावट कागदपत्रांद्वारे मेधा यांनी हे कंत्राट मिळवून १०० कोटींचा घोटाळा केला असा आरोप राऊतांनी केला होता. त्यावर सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. निकालानंतर खा. राऊत म्हणाले, ‘न्यायव्यवस्था दबावाखाली आहे. ज्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला जातात, तिथे न्यायाची काय अपेक्षा करायची?’ तर मेधा साेमय्या म्हणाल्या, ‘या निर्णयाने मी समाधानी आहे. माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे.’

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article