मुलाचा मृत्यू झाला.File Photo
Published on
:
20 Nov 2024, 11:08 am
Updated on
:
20 Nov 2024, 11:08 am
मालेगाव : पत्र्याच्या घरात छताच्या दांडक्याला बांधलेल्या झोक्याचा गळफास बसल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.17) वळवाडे चटाणापाडा येथे घडली. ईश्वर (उर्फ शुभम) विजय बोरसे असे मृत मुलाचे नाव आहे.
ईश्वरचे आई - वडील ऊसतोड कामगार असल्याने गेल्या काही वर्षांपासून तो वळवाडे येथे त्याच्या आजी - आजोबांकडेच राहात होता. रविवारी (दि.17) सायंकाळी तो छताच्या दांडक्याला बांधलेल्या झोक्यावर खेळत होता. त्याची आजी बाहेर आलेल्या प्रचार कार्यकर्त्यांशी बोलून पुन्हा घरात आली असता, तिला ईश्वरला फास बसल्याचे दिसले. मदतीसाठी आरडाओरडा करताच बाहेर असलेल्या ईश्वरच्या आजोबांसह प्रचार कार्यकर्त्यांनी धाव घेत त्याच्या गळ्याचा फास मोकळा केला व मालेगावमधील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉ. आसिफ यांनी तपासून ईश्वरला मृत घोषित केले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.