‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विधान

1 hour ago 1
विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यात अभूतपूर्व यश मतदारांच्या साथीने मिळाले. या विश्वासाबद्दल मतदारांचे मनापासून आभार आहे. मतदारांचा हा कौल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर जनतेने मतांद्वारे व्यक्त केलेला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल आणि संवेदनशील नेतृत्वाचाही हा विजय आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या गडावर मतदारांनी महायुतीचा झेंडा रोवत जवळपास ५८ पैकी ४५ जागा दिल्या आहेत, हा आकडा आमचे आखलेले मिशन पूर्ण करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल. पुणे शहरातील आठपैकी सात आणि जिल्ह्यातील तेरापैकी अकरा जागा महायुतीला देताना पुणेकरांनी महायुतीच्या विकासाच्या कामांवर मोहोर उमटवली आहे. विरोधकांच्या फेक अजेंड्याला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले थेट उत्तर जनतेलाअधिक आश्वासक वाटल्याने मतांचे भरघोस दान महायुतीच्या पदरात मतदारांनी टाकले. मतांच्या लाचारीपोटी व्होट जिहादच्या विरोधकांच्या कारस्थानाला जनतेने धर्मयुद्धाव्दारे उत्तर देऊन एक इशाराच दिला आहे. कसब्यात भाजपचा जल्लोष केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांना खांद्यावर घेत अभिनंदन केले. कसबा मतदार संघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असून पोटनिवडणुकीत अपघाती काँग्रेसचा आमदार निवडून आला होता मात्र आता पुन्हा एकदा कसबा मतदार संघावर भाजपने मोहर उमटवली असल्याचे मत मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article