मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचा महाविकास आघाडीला पाठिंबा

4 days ago 2

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कामगार, शेतकरी आणि राज्यांच्या हक्कांवर हल्ला करून उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे. सीबीआय, ईडी, आयकर अशा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहेत. संविधान बदलण्याची भाषा उघडपणे करत आहेत. म्हणून भाजपप्रणीत महायुतीचा पराभव करून महाविकास आघाडीला प्रचंड विजयी करा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने केले आहे. समितीचे म्युनिसिपल मजदूर युनियन व म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन व संलग्न संघटनेचे अॅड. महाबळ शेट्टी, वामन कविस्कर, अशोक जाधव, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर, मुं.म.का.क. संघटना व मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास, मनपा आरोग्य संघटनेचे बा. शि. साळवी, हिंदुस्थान कर्मचारी संघाचे दिवाकर दळवी, मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे शेषराव राठोड, सजिवन पवार, शिक्षक सभेचे शरद सिंह, मनपा शिक्षक सेनेचे के. पी. नाईक मुंबई, बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी आवाहन केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article