Maharashtra Assembly Election | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क ANI Photo
Published on
:
20 Nov 2024, 6:20 am
Updated on
:
20 Nov 2024, 6:20 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२०) कुटुबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
ठाणे विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उमेदवार आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केदार दिघे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाशी शिंदे यांनी देखील आज ठाणे येथे मतदान केले.