विधानसभा निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.File Photo
Published on
:
23 Nov 2024, 9:53 am
Updated on
:
23 Nov 2024, 9:53 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधानसभेत महायुतीची सत्ता अबाधित राहिली आहे. सर्वाधिक जागा जिंकत भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील. यावरून आमच्यात कोणतेही वाद नाहीत. भाजपचे अध्यक्ष, शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२३) निकालानंतर दिली.