मुस्लीमबहुल पट्ट्यात भाजपचे वारे:38 पैकी 21 मतदारसंघामध्ये महायुतीला यश; बीजेपीने 14 जागा जिंकल्या, महाविकास आघाडीने 14
2 hours ago
1
राज्यात 20 टक्केंपेक्षा जास्त मुस्लीम मतदार असलेल्या 38 मतदारसंघामध्ये महायुतीने मुसंडी मारल्याचे समोर आले आहे. यातल्या 21 जागा महायुतीने पटकावल्यात. त्यातही 14 जागा भाजपने जिंकल्यात. त्यातही विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत मुस्लीमबहुल भागात भाजपला 11 जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा 3 जागांची वाढ झाल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाजावर व्होट जिहादचा आरोप केला. हिंदूंनी सुद्धा मत टाकण्यास पुढे यावे असे आवाहन केले. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघात महायुती विजयी झाली हे विशेष. मुस्लीमबहुल मतदारसंघात महायुतीने एकवीस जागा जिंकल्या. त्यात भाजपचा उमेदवार चौदा जागांवर विजयी झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा जिंकता आल्या. मुस्लीमबहुल मतदारसंघात महाविकास आघाडीने 14 जागा जिंकल्यात. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 6, काँग्रेसने 5, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा जिंकल्यात. उर्वरित जागांवर 2 ठिकाणी समाजवादी पक्ष, तर मु्स्लीमबहुल मतदारसंघातली 1 जागा 'एमआयएम'ने जिंकली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार... राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार मुस्लिमांची लोकसंख्या 1 कोटी 30 लाख आहे. एकूण लोकसंख्येच्या ही टक्केवारी 11.56 होते. मुंबईतल्या भिवंडी पश्चिममध्ये 49 टक्के मुस्लीम मतदार आहेत. अंधेरी पश्चिममध्ये 27 टक्के, वांद्रे पश्चिममध्ये 26 टक्के, अकोटमध्ये 27 टक्के, सोलापूर मध्यमध्ये 25 टक्के, नागपूर मध्यमध्ये 23 टक्के मुस्लीम मतदार आहेत. तरीही या भागामध्ये भाजपचे हिंदू उमेदवार विजयी झालेत. त्यांनी चक्क 20 ते 50 हजार मतांच्या फरकाने विजयश्री खेचून आणलीय. या मतदारसंघामध्ये अनेक मुस्लीम मतदार रिंगणात होते. त्यामुळे मतविभाजन झाले. त्याचा फायदा महायुती आणि भाजपला झाला. अमरावतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके विजयी झाल्या. त्यांना एकूण 60,087 मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी
27.9% होते. त्यांनी काँग्रेसच्या सुनील देशमुख यांच्यावर 5,413 मतांनी विजय मिळवल्या. या ठिकाणी सुनील देशमुख यांना 54,674 मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी 25.4% भरली. विशेष म्हणजे त्यांच्या जवळपास 54,551 मते अलीम पटेल मोहम्मद वाहिद यांनी घेतली. त्यामुळे देशमुख यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपने जिंकलेल्या जागा 1) भिवंडी पश्चिम - भाजपचे महेश चौघुले विजयी
- एकूण मते 70,172
- मतांची टक्केवारी 38.6%
- विजयातील फरक 48,192 मते
- काँग्रेसचे दयानंद मोतीराम चोरघे पराभूत
- एकूण मते 21,980
- मतांची टक्केवारी 12.1% 2) औरंगाबाद पूर्व - भाजपचे अतुल सावे विजयी
- एकूण मते 93,274
- मतांची टक्केवारी 43% - एमआयएमचे इम्तियाज जलील सैयद पराभूत
- एकूण मते 91,113
- मतांची टक्केवारी 42%
- पराभवातील फरक 2,161 मते
- काँग्रेसचे लहू शेवाळे पराभूत
- एकूण मते 12,568
- मतांची टक्केवारी 5.8% 3) अंधेरी पश्चिम - भाजपचे अमित साटम विजयी
- एकूण मते 84,981
- मतांची टक्केवारी 54.7%
- विजयातील फरक 19,599 मते
- काँग्रेसचे अशोक जाधव पराभूत
- एकूण मते 65,382
- मतांची टक्केवारी 42.1% 4) अकोट - भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी
- एकूण मते 93,338
- मतांची टक्केवारी 43.5%
- विजयातील फरक 18,851 मते
- काँग्रेसचे महेश गणगणे पराभूत
- एकूण मते 74,487
- मतांची टक्केवारी 34.7% 5) वांद्रे पश्चिम - भाजपचे आशिष शेलार विजयी
- एकूण मते 82,780
- मतांची टक्केवारी 55.5%
- विजयातील फरक 19,931 मते
- काँग्रेसचे आसिफ झकेरिया पराभूत
- एकूण मते 62,849
- मतांची टक्केवारी 42.1% 6) सोलापूर शहर मध्य - भाजपचे देवेंद्र राजेश कोठे विजयी
- एकूण मते 1,10,278
- मतांची टक्केवारी 54.7%
- विजयातील फरक 48,850 मते
- एमआयएमचे फारूक मकबूल शाबदी पराभूत
- एकूण मते 61,428
- मतांची टक्केवारी 30.4%
- काँग्रेसचे चेतन नरोटे पराभूत
- एकूण मते 16,385
- मतांची टक्केवारी 8.1% 7) धुळे शहर - भाजपचे अनुप अग्रवाल विजयी
- एकूण मते 1,16,538
- मतांची टक्केवारी 52.8%
- विजयातील फरक 92,234 मते
- ठाकेरेंच्या शिवसेनेचे अनिल गोटे पराभूत
- एकूण मते 24,304
- मतांची टक्केवारी 11% 8) नागपूर मध्य - भाजपचे प्रवीण दटके विजयी
- एकूण मते 90,560
- मतांची टक्केवारी 46.1%
- विजयातील फरक 11,632 मते
- काँग्रेसचे बंटी शेलके पराभूत
- एकूण मते 78,928
- मतांची टक्केवारी 40.2% 9) सायन-कोळीवाडा - भाजपचे आर. तमिल सेल्वन विजयी
- एकूण मते 73,429
- मतांची टक्केवारी 48.2%
- विजयातील फरक 7,895 मते
- काँग्रेसचे गणेश कुमार यादव पराभूत
- एकूण मते 65,534
- मतांची टक्केवारी 43% 10) कारंजा - भाजपच्या सई डहाके विजयी
- एकूण मते 80,645
- मतांची टक्केवारी 40.3%
- विजयातील फरक 33,208 मते
- शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञायक पाटणी पराभूत
- एकूण मते 47,437
- मतांची टक्केवारी 23.7% 11) पुणे कॅन्टोनमेंट - भाजपचे सुनील कांबळे विजयी
- एकूण मते 76,032
- मतांची टक्केवारी 48.4%
- विजयातील फरक 10,320 मते
- काँग्रेसचे रमेश बागवे पराभूत
- एकूण मते 65,712
- मतांची टक्केवारी 41.8% 12) रावेर - भाजपचे अमोल जावळे विजयी
- एकूण मते 1,13,676
- मतांची टक्केवारी 49.3%
- विजयातील फरक 43,562 मते
- काँग्रेसचे धनंजय चौधरी पराभूत
- एकूण मते 70,114
- मतांची टक्केवारी 30.4% 13) वाशिम - भाजपचे श्याम खोडे विजयी
- एकूण मते 1,22,914
- मतांची टक्केवारी 50.1%
- विजयातील फरक 19,874 मते
- ठाकरेंच्या शिवसेनेचे सिद्धार्थ देवले पराभूत
- एकूण मते 1,03,040
- मतांची टक्केवारी 42% 14) मलकापूर - भाजपचे चैनसुख संचेती विजयी
- एकूण मते 1,09,921
- मतांची टक्केवारी 52.9%
- विजयातील फरक 26,397 मते
- काँग्रेसचे राजेश एकाडे पराभूत
- एकूण मते 83,524
- मतांची टक्केवारी 40.2% मुस्लीमबहुल मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेने जिंकलेल्या जागा 1) औरंगाबाद पश्चिम
- शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट विजयी
- एकूण मते 1,22,498
- मतांची टक्केवारी 49.2%
- विजयातील फरक 16,351 मते
- ठाकरेंच्या शिवसेनेचे राजू शिंदे पराभूत
- एकूण मते 1,06,147
- मतांची टक्केवारी 42.7% 2) कुर्ला - शिंदेंच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर विजयी
- एकूण मते 72,763
- मतांची टक्केवारी 46.5%
- विजयातील फरक 4,187 मते
- ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवीणा मोराजकर पराभूत
- एकूण मते 68,576
- मतांची टक्केवारी 43.8% 3) चांदीवली - शिंदेंच्या शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी
- एकूण मते 1,24,641
- मतांची टक्केवारी 51.9%
- विजयातील फरक 20,625 मते
- काँग्रेसचे नसीम खान पराभूत
- एकूण मते 1,04,016
- मतांची टक्केवारी 43.3% 4) नांदेड उत्तर - शिंदेंच्या शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विजयी
- एकूण मते 83,184
- मतांची टक्केवारी 37.6%
- विजयातील फरक 3,502 मते
- काँग्रेसचे अब्दुल सत्तार अब्दुल गफूर पराभूत
- एकूण मते 79,682
- मतांची टक्केवारी 36.1% 5) नांदेड दक्षिण - शिंदेंच्या शिवसेनेचे आनंद तिडके पराभूत
- एकूण मते 60,445
- मतांची टक्केवारी 29.5%
- विजयातील फरक 2,132 मते
- काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे पराभूत
- एकूण मते 58,313
- मतांची टक्केवारी 28.5% मुस्लीमबहुल मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागा 1) अमरावती - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके विजयी
- एकूण मते 60,087
- मतांची टक्केवारी 27.9%
- विजयातील फरक 5,413 मते
- काँग्रेसचे सुनील देशमुख पराभूत
- एकूण मते 54,674
- मतांची टक्केवारी 25.4%
- पराभवातील फरक 5,413 मते
- आझाद समाज पक्षाचे अलीम पटेल मोहम्मद वाहिद पराभूत
- एकूण मते 54,551
- मतांची टक्केवारी 25.3%
- पराभवातील फरक 5,536 मते 2) अणुशक्तीनगर - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक विजयी
- एकूण मते 49,341
- मतांची टक्केवारी 33.7%
- विजयातील फरक 3,378 मते
- शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फहाद अहमद पराभूत
- एकूण मते 45,963
- मतांची टक्केवारी 31.4%
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)