मोफत वाळू 52 जणांनाच; तीन हजार घरकुलांची कामे वाळूअभावी रखडली:लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी पैठणमध्ये ग्रामपंचायतींचे होतेय दुर्लक्ष‎

2 hours ago 1
सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थींसाठी आवास योजना अमलात आणली आहे. या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी प्रती ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय शासनाने घेऊन पाच महिने झाले. मात्र, पैठणमध्ये आजपर्यंत केवळ ५२ लाभार्थींना मोफत वाळूचा लाभ मिळाला आहे. यात विविध घरकुल योजनेचे तालुक्यात १३ हजार ८१ घरकुल मंजूर असून ७ हजार घरकुलांची कामे झाली आहेत. ६०८१ घरकुलांची कामे प्रगतिपथावर असली तरीही तीन हजारच्या वर लाभार्थींचे घरकुल केवळ वाळू नसल्याने रखडले असल्याचे समोर आले आहे. यात मोफत वाळू उपलब्ध आहे. मात्र त्या- त्या ग्रामपंचायतीने लाभार्थींची नावे तहसील कार्यालयात नियमानुसार दिली नसल्याने गरजू लाभार्थींना मोफत वाळू मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. मोफत वाळू या निर्णयानुसार तहसील प्रशासनाने पाहिजे तेवढी वाळू उपलब्ध करून ठेवली आहे. मात्र, पंचायत समितीचे उदासीन धोरण व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे तालुक्यातील हजारो लाभार्थी मोफत वाळूपासून वंचित राहत आहेत. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने काही महिन्यांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आजपर्यंत ५२ लाभार्थींना मोफत वाळू मिळाली. मात्र, त्यानंतर पंचायत समिती व त्या-त्या गावांतील लाभार्थींनी पंचायत समितीला आधार कार्ड दिले नसल्याने मोफत वाळूपासून हजारो लाभार्थी वंचित असल्याचे समोर आले आहे. लाभार्थी प्रकाश हिवराळे म्हणाले, मोफत वाळू मिळाली नाही. विकत घेणेही मला परवडणारे नसल्याने घरकुलाचे काम रखडले आहे. प्रत्येक व्यक्तीला हक्काचा निवारा मिळावा याकरिता शासनाकडून विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. आधी घराचे बांधकाम करताना लाभार्थींना वाळूअभावी घराच्या बांधकामास विलंब लागत होता. त्यामुळे शासनाने या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी प्रती ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, पैठण तालुक्यात तहसील प्रशासनाने मुबलक वाळू उपलब्ध करून ठेवली. मात्र, गटविकास अधिकारी व संबंधिताने घरकुलाच्या लाभार्थींना या मोफत वाळूसंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. लाभार्थींमध्ये जनजागृतीचाही अभाव तहसीलदारांचे लक्ष, पण पंचायत समितीचा दिसतोय गोंधळ तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सांगितले की, घरकुलाच्या लाभार्थींना मोफत वाळू उपलब्ध आहे. त्यांना लाभ दिला जाईल. संबंधितांची पंचायत समितीने यादी द्यावी. गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड म्हणाल्या, आम्ही मोफत वाळूचे प्रस्ताव दिले आहेत. मात्र, मोफत वाळू किती लाभार्थींना मिळाली हे सांगता येणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा सूचना देऊ.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article