Published on
:
23 Nov 2024, 7:44 am
Updated on
:
23 Nov 2024, 7:44 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधानसभेत महायुतीची सत्ता अबाधित राहणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. भाजप-महायुतीची निर्णायक दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. मतमोजणीला चार तासांहून अधिक काळ झाला असून, तब्बल २१७ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. या निकालावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
गडकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-महायुतीला मिळालेल्या महाविजयासाठी महाराष्ट्रातील जनतेचे हृदयपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार! पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-महायुतीने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप-महायुती नेहमीच कटिबद्ध आहे आणि यापुढेही राहील.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गतीशीलतेने पुढे नेईल, असा मला ठाम विश्वास आहे. या भव्य विजयासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे.पी.अड्डा यांच्यासह पक्षाच्या समस्त कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तसेच या निवडणूकीत मतदार जागृतीसाठी अनेक स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-महायुतीला मिळालेल्या महाविजयासाठी महाराष्ट्रातील जनतेचे हृदयपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार! पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-महायुतीने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षा…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 23, 2024