राजकोटावर 100 कोटींची शिवसृष्टी:‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या धर्तीवर प्रकल्पाची बांधणी; मावळे, मत्स्यालय, राजवाड्याचेही होणार दर्शन

2 hours ago 1
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे अवघ्या राज्यात जनक्षोभ उसळला असताना आता राज्य सरकारने या ठिकाणी 100 कोटींची शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उर्जा हिंदुत्त्वाची नामक ही शिवसृष्टी न्यूयॉर्क स्थिती स्टॅचू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. यामाध्यमातून शिवप्रेमींना मावळे, मत्स्यालय आणि राजवाड्याचेही दर्शन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. पण हा पुतळा नुकताच कोसळला. या घटनेमुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनीही या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नव्याने उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या पुतळ्यानजिक ऊर्जा हिंदुत्त्वाची नामक शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र चव्हाणांपुढे प्रकल्पाचे सादरीकरण या प्रकल्पावर जवळपास 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हा नियोजन समितीच्या नव्या सभागृहात शुक्रवारी कुडाळ - मालवण विधानसभेसाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्यानंतर मंत्री केसरकर यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पाचे वास्तूविशारद अमित कामत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापुढे हे सादरीकरण केले. यावेळी बोलताना केसरकर यांनी या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची परवानगी घेतली जाईल असे स्पष्ट केले. पुतळ्याची जागा शासनाकडे हस्तांतरित दीपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आता तिथे सार्वजनिक बांधकाम विभाग पुतळा उभारत आहे. यासाठी 20 कोटी खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय येथे भव्य असा पर्यटन प्रकल्प व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित तसेच शिवकालीन वास्तव दर्शवित असलेला प्रकल्प व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीसाठी प्रयत्न राजकोट येथे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे तिथे शासकीय मालकीची सव्वा 6 एकर जागा आहे. ही जागा पर्यटन विकास, गार्डन व वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित आहे. ही जमीन मालवण नगरपरिषदेच्या ताब्यात असल्यामुळे प्रकल्प उभारणीसाठी जागेची अडचण येणार नाही. प्रस्तावित प्रकल्पात काय असेल याची एक पीपीटी मी तयार केली आहे. त्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिल्यानंतर किंवा त्यात बदल सूचवल्यानंतर त्याचे सादरीकरण राज्यस्तरीय उच्चस्तरीय समितीपुढे केले जाईल. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपुढे त्याचे सादरीकरण केले जाईल. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. रवींद्र चव्हाण यांनी भाष्य करणे टाळले उल्लेखनीय बाब म्हणजे दीपक केसकर यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पाचे सादरीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापुढे करण्यात आले. पण स्वतः चव्हाण यांनी या प्रकल्पावर कोणतेही भाष्य केले नाही. केसरकर यांनी स्वतःहून या प्रकल्पासाठी पालकमंत्र्यांच्या मान्यतेची गरज असल्याचे प्रकर्षाने नमूद केले. त्यानंतरही रवींद्र चव्हाण यांनी त्यावर भाष्य न केल्यामुळे या प्रकरणी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. काय आहेत प्रकल्पाची वैशिष्टे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article