विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. File Photo
Published on
:
20 Nov 2024, 12:03 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:03 am
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाईचे सत्र सुरूच आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध देशी, विदेशी मद्य वाहतुकीवर व विक्रीवर केलेल्या कारवाईत 8 वाहनासह 15 लाख 34 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई 18 नोव्हेंबर रोजी रात्री करण्यात आली. देशी विदेशी मद्य वाहतुकीवर व विक्रीवर कारवाई करून 508 देशी मद्य, 115 विदेशी दारू, 210 बिअर, 840 हातभट्टी दारू असा एकूण 15 लाख 34 हजार 60 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुय्यम निरीक्षक विभाग यांनी कामती ता. मोहोळ येथे कारवाई करून देशी मद्य टँगो पंचचे 38 बॉक्सेस व विदेशी मद्यचे विविध ब्रँडचे 9 बॉक्सेस एक मोटारसायकल व तीन आरोपीसह कारवाई करून 2 लाख 43 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आतापर्यंत पावणेदोन कोटीचा मुद्देमाल जप्त
15 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या आचारसंहितेच्या कालावधीत शहर व जिल्ह्यात एकूण 332 गुन्हे नोंदवण्यात आले असून 308 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत केलेल्या कारवाईत 10, 2430 लिटर गुळमिश्रित रसायन, 8824 लीटर हातभट्टी दारू, 1871 लीटर ताडी, 1226 बाटली देशी दारू, 762 विदेशी दारू, 288 बिअर, 70 वाहनासह 1 कोटी 67 लाख 77 हजार 550 इताक मुद्देमाल जप्त करण्यात आला.