​​​​​​​राज्यभरात ८० हजार समाजकंटकांवर कारवाई:मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभाग सतर्क, 2 दिवसांत वाहनांची होणार कसून तपासणी

4 days ago 2
राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिस दल सतर्क झाले असून मागील एक महिन्याच्या कालावाधीत तब्बल ८० हजार समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत पोलिस दलास अधिक सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी नाक्यांवर एकही वाहन विना तपासणी जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी ता. २० मतदान होणार आहे. या निवडणुकीत ४१३६ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. राज्यातील ९.७० कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात १००१८६ मतदान केंद्रावर मतदान होणार असून त्यापैकी ६७ हजार मतदान केंद्रावर बेवकास्टींग केले जाणार आहे. दरम्यान, राज्यभरात निवडणुक कालावधी व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस दलास सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार संवेदनशील मतदान केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यासोबतच गुुन्हेगार व कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. या शिवाय आवश्‍यक त्या ठिकाणी केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मागील एक महिन्यात राज्यभरात गुुन्हेगारांची तपासणी मोहिम, कोंम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले असून यामध्ये आढळून आलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांची माहिती घेऊन त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई झाली असून आज पर्यंत तब्बल ८० हजार समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरात पुढील दोन दिवस अतिशय महत्वाचे असल्याने त्यानुसार पोलिस दलास अधिक सतर्क राहण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देेण्यात आले आहेत. यामध्ये तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करावी, तसेच खाजगी ट्रॅव्हल्स तसेच इतर वाहनांचीही तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. राज्यभरात पुढील दोन दिवसांत अवैधरित्या मद्य, रोकड, मौल्यवानवस्तू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच दिवसा व रात्रीच्या वेळी संवेदनशीलभागात गस्त ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article