राज्यात आघाडीचेच सरकार येणार - अनिल परब:रोहित पवार हे नक्की सरकारमध्ये मंत्री होणार असल्याचा विश्वास

3 hours ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार जाऊन राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा करीत माजी मंत्री, आमदार अनिल परब यांनी मी मंत्री होईल की नाही माहित नाही, परंतु आमदार रोहित पवार हे नक्की सरकारमध्ये मंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. कर्जत एसटी आगाराचे लोकार्पण झाल्यानंतर झालेल्या सभेत माजी मंत्री परब हे बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. परब पुढे म्हणाले की, आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेली खुर्ची ही जनतेच्या कामासाठी असेल, तर तिचा उपयोग आहे. तुम्ही कर्तव्यदक्ष आमदार आपल्या भागातून निवडून दिला. कर्जत बस आगाराबाबत विभागातील वरिष्ठ अधिकारी नकार घंटा वाजवत होते. मी मंत्री असताना आमदार रोहित पवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एका महिन्यात कर्जतच्या बस आगाराला मान्यता मिळवून दिली. आज त्याची वचनपूर्ती कार्यक्रम होत असल्याचा आनंद होत असल्याचे परब म्हणाले. आमदार रोहित पवार म्हणाले की, मागील लोकप्रतिनिधी फक्त एसटी आगाराचे पत्र तयार असल्याचे सांगून वेळ मारून नेत होते. आपण मतदारसंघात दोन पोलिस ठाणे, एक पोलिस प्रशिक्षण केंद्र मंजूर केले. कर्जत एसटी आगाराचा गेल्या कित्येक वर्षांचा प्रश्न आपण मार्गी लावल्याचे पवार म्हणाले. मनसे कार्यकर्त्यांचा सत्कार एसटी बस आगारासाठी तुरुंगवास भोगलेल्या आंदोलनकर्त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कर्जतला अत्याधुनिक बस आगार व्हावे, यासाठी मनसेच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी कर्जत बसस्थानकात मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे या कार्यकर्त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article