राज्यात एवढा मोठा विजय होऊनही महायुतीत उत्साह नाही, काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांचे विधान

1 hour ago 1

महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं तरी लोकांमध्ये उत्साह नाही असे विधान नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. तसेच ईव्हीएम प्रकरणी जन आंदोलन सुरू करू असेही चव्हाण म्हणाले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चव्हाण म्हणाले की, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विधानसभेचा लागलेल्या या निकालाने लोक अजूनही आश्चर्यचकित आहेत. लोकांमध्ये उत्साह नाही आणि महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज नव्हता. महायुतीचा विजय झाल्यानंतरही गावागावात तो उत्साह नाहिये. ईव्हीएममध्ये काही घोटाळा झाला असं सांगितलं जातंय. यावर आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते विचार करतील आणि जन आंदोलन सुरू करतील असेही चव्हाण म्हणाले.

#WATCH | Delhi | Nanded Congress MP Ravindra Vasantrao Chavan says, “Mahayuti has got a clear mandate in Maharashtra. You can see that people are worried about how this happened. The kind of excitement there should have been in people is missing even after Mahayuti’s victory. It… pic.twitter.com/Zyw8oVoHPv

— ANI (@ANI) November 29, 2024

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article