Published on
:
23 Nov 2024, 1:39 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:39 pm
तुळजापूर : राज्य सरकारच्या विकासाच्या योजना जनतेने स्वीकारल्या आणि महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी महाराष्ट्रात निवडून दिले. हा महायुतीच्या विकासाच्या कामाचा विजय आहे, अशा शब्दात तुळजापूरचे नवनिर्वाचित आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी आज (दि.23) आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅड. धीरज पाटील यांचा महायुतीचे उमेदवार राणा जगदीश सिंह पाटील यांनी 36510 मतांनी दणदणीत पराभव केला. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या इतर 18 उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांना अखेरच्या 30 फेरीमध्ये 1,30,352 मते प्राप्त झाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज आप्पासाहेब पाटील यांना 93,842 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार देवानंद रोचकरी 16271 मते, प्रहार जनशक्ती उमेदवार आप्पासाहेब दराडे, ऑल इंडिया माजीद पक्षाचे शब्बीर तांबोळी, आदर्श समाज पार्टी धीरज पाटील, संभाजी ब्रिगेड पार्टी शरद पवार, जनहित लोकशाही पार्टी सचिन शेंडगे, वंचित बहुजन आघाडी डॉ स्नेहा सोनकाटे 7792 मते , इतर अपक्ष उमेदवार अमीर शेख अमर शेख उज्वला काटे काकासाहेब राठोड योगेश केदार तात्या रोडे दत्तात्रय कदम धनाजी हुंबे पूजा देडे मन्सूर शेख गणेश रोज करी व सत्यवान सुरवसे हे निवडणुकीच्या रिंगणात होते या सर्व अपक्ष उमेदवाराची डिपॉझिट जप्त झालेले आहे. या निवडणुकीमध्ये नोटा पर्यायासाठी फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून नाही.
या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीमध्ये राणा जगदीश पाटील यांनी 793 मताची मताधिक्य मिळवले त्यांना 4157 तर धीरज पाटील यांना 3364 मते मिळाली होती यानंतर राणा जगजीत सिंह यांचीही लीड कमी झाली नाही ती वाढत राहिली अनुक्रमे दुसऱ्या फेरीमध्ये 1910, तिसरा फेरीमध्ये 4156, चौथ्या फेरीमध्ये 5547, पाचव्या फेरीमध्ये 6934, सहाव्या फेरीमध्ये 8253, सातव्या फेरीमध्ये 8056, आठव्या फेरीमध्ये 10234, नवी फेरी 12450, दहाव्या फेरीत 12990, पंधरा फेरीमध्ये 20,049, विसाव्या फेरीमध्ये मताधिक्य 24, 559. पंचविसाव्या फेरीला ये मताधिक्य आणखी वाढले ते 30,402 तिसऱ्या फेरीला हे मताधिक्य 36510 असे राहिले.
या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण जाहीरनामांमध्ये आणि लोकांना मध्ये बोलताना जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये तामलवाडी व होर्टी येथे औद्योगिक वसाहत निर्माण करून तेथे किमान पंधरा हजार तरुणांना रोजगार देणारच याशिवाय तुळजापूर शहराचा कायापालट करणारा विकास निश्चित होईल या सर्व निकालानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित पूर्ण केल्या जातील लाडके बहीण योजना तसेच शेतकरी सन्मान योजना आणि राज्य केंद्र सरकारच्या विकास कामांच्या योजनांमुळे मला मतदारांनी भरभरून मतदान केले आहे या प्रत्येक मतदाराचे आपण या निमित्ताने आभार मानतो आहोत या प्रचारादरम्यान केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जो नारा नळदुर्ग येथील सभेमध्ये दिला त्याचा खूप मोठा परिणाम प्रचारामध्ये झाला त्याचा फायदा आज दिसून येतो आहे असे देखील नवनिर्वाचित उमेदवार आमदार पाटील यांनी सांगितले.
या निवडणुकीमध्ये मतमोजणीच फायदा कोणता उमेदवार होणार यामुळे समाजवादी पार्टी बहुजन वंचित आघाडी व ऑल इंडिया माझी या पक्षाचे उमेदवार मोठे मताधिक्य घेतल्यास सत्ताधारी उमेदवाराला नुकसान होईल अशी चर्चा होती परंतु इतर सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाल्यामुळे आमदार पाटील यांचा विजय सहज झाला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवाराची मागणी केली होती परंतु त्यांना डावलून जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना उमेदवारी दिली होती परिणामी महाविकास आघाडीला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपा नेते सुनील मधुकरराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचा चांगला प्रचार करून तुळजापूर तालुक्यातील मोठे मताधिक्य आमदार पाटील यांना प्राप्त करून दिले आहे. त्यांच्या मताचा चांगला फायदा राणा जगजीत सिंह पाटील यांना या निवडणुकीत झालेला आहे.
हा विजय तुळजापूर शहरात आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी जो विकास निधी दिलेला आहे त्याची उतराई मतदारांनी मताच्या रूपाने केली आहे राणा दादा यांना या शहरातून 3320 मतांची लीड दिली आहे
विनोद गंगणे, भाजप नेते तुळजापूर
नळदुर्ग शहरांमध्ये प्रचंड विकासाचे काम आमदार राणा जगदीश सिंह यांनी केले त्याचा परिणाम म्हणजे लोकांनी त्यांना मतदान करताना कोणतीही जात-पात न पाहता उस्फूर्तपणे मतदान केले त्यामुळे हा मोठा विजय आहे
नय्यर जहागीरदार, माजी नगराध्यक्ष नळदुर्ग
तुळजापूर तालुक्यामध्ये विकासाची गंगा खऱ्या अर्थाने आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि महायुतीच्या सरकारने आणली प्रचंड मोठा निधी तालुक्यात गावोगाव खर्च केला त्यामुळे राणा दादा यांना मोठे जनसंपर्क लाभले
संतोष बोबडे, तालुकाध्यक्ष भाजपा