राष्ट्रवादी शरद पवार गटावर अजित पवार गटाची मात:अहेरीत फॅमिली ड्रामात पोरगी व पुतण्याचा पराभव करून धर्मरावबाबा आत्राम विजयी
2 hours ago
1
राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम आणि पुतण्या अंबरीशराजे आत्राम यांनी बंड पुकारले होते. या कौटुंबिक लढाईत पुन्हा एकदा बाबा जिंकले आहे. बाबा आत्राम यांनी ही निवडणूक जिंकून बाप हा बापच असते हे दाखवून दिले. अतिशय चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या येथील निवडणुकीत बाबा आत्राम यांना ५४ हजार २०६, अंबरीशराजे आत्राम यांना ३७ हजार ३९२, भाग्यश्री आत्राम यांना ३५ हजार ७६५ तर अपक्ष उमेदवार हनुमंतू मडावी यांना २७ हजार १८८ मते पडलीत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातून बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात शरद पवार यांनी त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम यांना उभे केले होते. महायुतीत हा मतरासंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याने भाजपचे माजी आमदार व बाबा यांचे पुतणे अंबरीशराजे आत्राम यांनी बंडखोरी केली होती. तीन आत्रामांच्या लाढाईत कोणी जिंकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रचारात मुलीने धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर टीका केली होती. त्यांनी आता थांबावे असे आवाहन केले होते. धर्मराव बाबा आत्राम मतदारसंघात कधी फिरकत नाहीत. काहीच कामे करीत नाही. मीच त्यांच्यावतीने कारभार बघत असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे पुतण्या अंबरीश राजे यांनी घरातच आमदार राहावा याकरिता बाप आणि मुलगी निवडणूक लढत असल्याचा आरोप केला होता. आजपर्यंत अहेरी विधानसभेत काका धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध पुतण्या अंबरीशराव आत्राम असा सामना होत असे. त्यात यावर्षी पोरीची भर पडली आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्याच तालमीत वाढलेल्या, त्यांच्याकडूनच राजकारणाचे धडे गिरवलेल्या, त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळलेल्या त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम उमेदवारीसाठी धाकल्या पवारांचा पक्ष सोडून थोरल्या पवारांकडे गेल्या. आतापर्यंत दुभंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बाप आणि पोरीमध्ये म्हणजेच धर्मरावबाबा आहेत. बाब, पोरगी आणि पुतण्या असा अनोखा सामना असलेली अहेरी विधानसभा महाराष्ट्रातील एकमेव विधानसभा आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)