निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडून विजयी उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर विजय प्रमाणपत्र स्वीकारतानाPudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 4:37 pm
Updated on
:
23 Nov 2024, 4:37 pm
लोहा : लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात माजी आमदार व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्व उमेदवारांना बाजूला सालीत आपला विजय मिळवला. त्यामुळे लोहा मतदारसंघात चिखलीकरांचा दबदबा कायम असल्याचे मानले जात आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार प्रा. मनोहर धोंडे व चंद्रसेन सुरनर यांनी व्हीएम मशीनवर आक्षेप घेतला त्यामुळे निवडणूक निकाल रात्री उशिरा 9 वाजता घोषित करण्यात आले.
लोहा विधानसभा मतदारसंघात २४ फेऱ्यात मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) प्रतापराव पाटील चिखलीकर यांना ७२ हजार ७५० एवढी मते मिळली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) एकनाथ पवार यांना ६१ हजार ७७७ एवढी मते मिळाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना १० हजार ९७३ मतांची आघाडी मिळाली.
या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत मानली जात होती. त्यामुळे चिखलीकर यांचे नाव फारसे चर्चेत नव्हते. परंतू चिखलीकरांची या मतदार संघावर असलेली पकड ही सर्वांच्या चर्चेचा विषय झाला होता. प्रत्येक गावात चिखलीकर समर्थकांची संख्या अगणिक आहे. त्यामुळे चिखलीकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. या विजयामुळे विरोधकांसह मतदारसंघात चर्चेचा विषय झाला आहे.
लोहा विधानसभा मतदारसंघात ३ लाख १ हजार ६५० मतदारांपैकी २ लाख २६ हजार ८३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख १७ हजार ६५१ पुरुष, १ लाख ९ हजार १८३ महिला, तर ३ तृतीयपंथी असे एकूण २ लाख २६ हजार ८३७ एवढ्या मतदारांनी मतदान केले. लोहा विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी ७५.२० टक्के मतदान झाले होते.यात ३२ .०७ टक्के मतदान एकट्या चिखलीकर यांना मिळाले.
अपक्ष उमेदवार प्राध्यापक मनोहर धोंडे व जनहित लोकशाही पक्षाचे उमेदवार चंद्रसेन सुरनर यांनी मशीनवर क्षेत्र नोंदवला त्यामुळे पाच बूथ ची दोन वेळा फिर मतमोजणी करण्यात आली त्यामुळे निकाल घोषित करण्यास विलंब झाला रात्री नऊ वाजता निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करून घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी केली.