रेल्वेत आरोग्य निरीक्षक पदावर नोकरी लावण्याच्या आमिष:10 लाखांची आर्थिक फसवणूक, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

2 hours ago 1
रेल्वे मध्ये आरोग्य निरीक्षक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेश दिनकर राजगुरु (वय- 50, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत फसवणूक झालेल्या व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. फसवणूक झालेले तक्रारदार चिंचवड परिसरात राहण्यास असून त्यांची आरोपी राजगुरु याच्याशी 2021 मध्ये ओळख झालेली होती. तक्रारदाराच्या ओळखी मधील काही जणांना रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले गेले होते. रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे भासवून त्याने तक्रारदाराकडे पैशाची केली होती. त्यानंतर तक्रारदाराने राजगुरुला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात एकूण दहा लाख रुपये वेळोवेळी दिले. दहा लाख रुपये दिल्यानंतर ही आरोपीने राजगुरु यांना नोकरी लावली नाही.त्यानंतर राजगुरुने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भेटण्यासाठी बोलावले. त्यास पुन्हा नोकरी लावून देण्याचा विश्वास दाखवला. तक्रारदाराच्या ईमेलवर त्याने रेल्वेत आरोग्य निरीक्षकपदावर नोकरी मिळाली असल्याचे बनावट नियुक्तीपत्र तयार करून पाठविले. प्रशासकीय चौकशीत नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारदाराने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यावर आरोपी राजेश राजगुरु याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस चव्हाण पुढील तपास करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article