भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. (Image source- X)
Published on
:
19 Nov 2024, 6:27 am
Updated on
:
19 Nov 2024, 6:27 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव तर शुभमन गिल दुखापतीमुळे पर्थ कसोटीला मुकणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यामुळे आता टीम इंडियाचा फलंदाजीच्या क्रमवारीत फेरबदल अनिवार्य ठरला आहे. (Border-Gavaskar Trophy 2024-25) जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखालील संघात यशस्वी जैस्वालबरोबर दुसरा सलामीवीर म्हणून कोणते पर्याय आहेत हे जाणून घेवूया...
केएल राहुल(Image source- X)
यशस्वी जैस्वालबरोबर सलामीसाठी केएल राहुल हा संघ व्यवस्थापनासमोरील पहिला पर्याय आहे. सलामीचा त्याच्याकडे अनुभव असल्याने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल सलामीच्या स्थानासाठी आघाडीवर असल्याचे दिसते. सलामीवीर म्हणून त्याची धावांची सरासरी 32 आहे. सलामीला फलंदाजीला आलेले केएल राहुल याने सहा शतके झळकावली आहेत. ( Border-Gavaskar Trophy 2024-25)
अभिमन्यू ईश्वरन.File Photo
अभिमन्यू ईश्वरन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीच्या जोराव संघात स्थान पटकावले आहे. २९ वर्षीय अभिमन्यू याने यंदाच्या देशांतर्गत हंगामात सलग चार शतक झळकावली आहे; परंतु ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये चार डावात त्याने केवळ ३६ धावा केल्या. त्याची खराब खेळी असूनही, ईश्वरनने देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीने जोरदार सलामीवीर म्हणून त्याच्या नावाचा विचार होवू शकतो.
ध्रुव जुरेलFile Photo
मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसऱ्या सराव कसोटीच्या दोन्ही डावात भारताचा सर्वाधिक धावा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याने केल्या आहेत. या सामन्यात त्याने दोन डावात अनुक्रमे ८० आणि ६८ धावांची खेळी केली. आपल्या दमदार कामगिरीने संघातील ११ खेळाडूही सहभागाचा दावा केला आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत पर्थ कसोटीसाठी ध्रुव जुरेल यांचा सलामीसाठी विचार होवू शकतो.
विराट कोहली.File Photo
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नुकत्याच मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विराटची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. त्याने तीन सामन्यांच्या मालिकेतील सहा डावात केवळ ९३ धावा केल्या. यावर्षी कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर केवळ एक अर्धशतक आहे. आता ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. गिलला दुखापत झाल्याने, ऑस्ट्रेलियातील फलंदाजीचा मोठा अनुभव पाहता कोहलीवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन सुंदर.File Photo
भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याचाही सलामीवीर म्हणून विचार होवू शकतो. २०२१ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियात गाबा कसोटतील पहिल्या डावात ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याच्याकडे डावाला आकार देण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियातील त्याच्या कामगिरीचा विचार करुन त्यालाा सलामीला फलंदाजीची संधी मिळू शकते.