Published on
:
27 Nov 2024, 8:10 am
Updated on
:
27 Nov 2024, 8:10 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२७) नोटीस बजावली आहे. आशिष मिश्रावर साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने आशिष मिश्रा यांचे वकील सिद्धार्थ दवे यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. ( Lakhimpur Kheri violence )
प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
२०२१ मध्ये उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. माजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. सध्या आशिष मिश्रा जामिनावर बाहेर आहे. तो साक्षीदारांना धमाकवत असल्याची याचिका एका तक्रारदाराने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. आजच्या सुनावणीत आशिष मिश्रा यांच्या वकिलाने हे आरोप फेटाळून लावले. मात्र, सर्वोच् च न्यायालयाने आशिष मिश्रा याला चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करून आरोपांवर उत्तर मागवण्यास सांगितले आहे.
२०२१ मध्ये झाला होता हिंसाचार
३ ऑक्टोबर २०२२१ रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखीमपूर दौऱ्याला शेतकऱ्यांनी विरोध केला होता. यावेळी चार शेतकऱ्यांचा कारने चिरडून मृत्यू झाला. या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला. आशिष मिश्रा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी कार चालक आणि भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनाही बेदम मारहाण केली.सर्वोच्च न्यायालयाने २२ जुलै रोजी आशिष मिश्रा यांची जामिनावर सुटका केली होती. तसेच साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये म्हणून त्यांना दिल्ली आणि लखनौमध्ये न राहण्याचे निर्देश दिले होते. तथापि, २६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांना राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात राहण्याची परवानगी दिली होती. तसेच लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी लवकरच कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते.