लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए. आर. रेहमान यांचा घटस्फोट; लग्नापूर्वी ठेवल्या होत्या या 3 अटी

3 days ago 2

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर पत्नी सायरा बानो यांना घटस्फोट दिला आहे. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट लिहित त्यांना सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी 12 मार्च 1995 रोजी चेन्नईत लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी अरेंज मॅरेज केलं होतं आणि आपल्या पत्नीसाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या होत्या. अभिनेत्री सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत रेहमान यांनी याविषयीचा खुलासा केला होता. जोडीदार निवडण्यात त्यांच्या आईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

रेहमान यांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे जोडीदार शोधण्यासाठी पुरेसा वेळ आणि ऊर्जा नव्हता. “प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर माझ्याकडे जोडीदार शोधण्यासाठी वेळ नव्हता. त्यावेळी मी माझ्या कामात खूप व्यस्त होतो. पण मला माहीत होतं की लग्नासाठी तीच योग्य वेळ होती. मी 27 वर्षांचा होतो आणि माझ्या आईला सांगितलं की तुम्हीच माझ्यासाठी जोडीदार शोधा. यासोबतच मी त्यांना माझ्या तीन अटी सांगितल्या होत्या. ती सुंदर असावी, सुशिक्षित असावी आणि त्याचसोबत स्वभावाने दयाळू असावी.. या माझ्या तीन अटी होत्या. सायरामध्ये माझ्या आईला हे तिन्ही गुण दिसले होते.”

हे सुद्धा वाचा

“We had hoped to scope the expansive thirty, but each things, it seems, transportation an unseen end. Even the throne of God mightiness tremble astatine the value of breached hearts. Yet, successful this shattering, we question meaning, though the pieces whitethorn not find their spot again. To our friends, convey you for…

— A.R.Rahman (@arrahman) November 19, 2024

रेहमान यांच्या आईने त्या दोघांची भेट चेन्नईतील एका सूफी मंदिरात करून दिली होती. याविषयी त्यांनी सांगितलं, “सायरा आणि माझं लग्न 12 मार्च 1995 रोजी चेन्नईतील त्याच इमारतीत झालं होतं जिथे मी 2006 मध्ये एएम स्टुडिओ सुरू केला होता.” ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांची मोठी मुलगी खतीजा रेहमानचं लग्न 2022 मध्ये पार पडलं होतं. या लग्नाचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. रेहमान यांची पत्नी सायरा बानो या गुजरातमधील कच्छ इथल्या आहेत. तर त्यांचे वडील सौदी एअरलाइन्स आणि इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट होते. आश्चर्याची बाब म्हणजे रेहमान यांच्या आईने आधी सायराची छोटी बहीण मेहरसाठी स्थळ नेलं होतं. मात्र त्यांना सायराचा स्वभाव खूप आवडला आणि अखेर त्यांनी त्यांची निवड रेहमान यांच्यासाठी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article