"लढा माझ्या शेतकऱ्याचा" यात्रा:सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व्याहाड ते मोवाड यात्रा, अनिल देशमुख यांची माहिती

2 hours ago 1
भाजपा प्रणित सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. शेतकऱ्यांचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे सामान्य जनता त्राही माम झाली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने व्याहाड ते मोवाड “लढा माझ्या शेतकऱ्याचा” यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी दिली. विदेशातून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात होत असल्याने कापसाला भाव मिळत नाही. सध्या संत्रा व मोसंबीला मातीमोल भाव मिळत आहे. बांग्लादेशला संत्रा पाठविण्यासाठी अगोदर १८ रुपये कर लागत होता. आता तोच कर १०८ रुपये झाला आहे. यामुळे संत्रा व मोसंबीची निर्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सोयाबीन तेल व सोयापेंड मोठया प्रमाणात आयात करण्यात येत असल्याने सोयाबीनला भाव मिळत नाही. नुकसान होवूनही शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही असे देशमुख म्हणाले. पिक विमा कंपनीकडून जाचक अटी लावून मदत देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते. दुसरीकडे खते, फवारणीचे औषध, शेतकी अवजारे यांच्यावर मोठ्या प्रमाणात जी.एस.टी. लावल्याने त्याचे भाव वाढले आहे. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बाजारात आज मिळत असलेल्या शेतमालातून साधा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. खाण्याच्या तेलापासून ते मिठापर्यत सर्वच वस्तुंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरी सुध्दा राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले असे अनिल देशमुख व सलील देशमुख म्हणाले. यात्रेचा हा पहिला टप्पा व्याहाड ते मोवाड असून ६ दिवसात ७० गावात ही यात्रा जाणार आहे. सकाळी ८ वाजतापासून यात्रेला सुरुवात होईल व रात्री ८ वाजता त्या दिवशीची यात्रा संपेल. ज्या गावात ही यात्रा संपणार त्याच गावात यात्रेचा मुक्काम राहणार आहे. यात चावडी बैठका घेवून नागरिकांशी संवाद सुध्दा साधण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगीतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article