Published on
:
29 Sep 2024, 11:04 am
Updated on
:
29 Sep 2024, 11:04 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: सध्या राज्यातील बहुचर्चित महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता हस्तांतराला सुरूवात झाली आहे. या संदर्भातील माहिती राज्य महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी X पोस्ट करत दिली आहे.
राज्यातील 34 लाख 74 हजार 116 महिलांना 521 कोटी रुपये
मंत्री आदिती तटकरे यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. या अंतर्गत आज रविवार, 29 सप्टेंबर रोजी राज्यातील 34 लाख 74 हजार 116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आली आहे.
उर्वरित महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार
उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत, असे देखील मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.