'लाडक्या बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना बहिणीच जोडा दाखवतील' File Photo
Published on
:
29 Sep 2024, 7:14 am
Updated on
:
29 Sep 2024, 7:14 am
पुणे : पुढारी ऑनलाईन
आज पुण्यात भुयारी मेट्रोचं लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना बहिणी जोडा दाखवतील असा घणाघात त्यांनी विरोधकांवर केला.
या योजनेचा राज्यातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे. लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लावण्यासाठीची ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांना विरोध करणाऱ्यांवर टीका केली.
शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख उपस्थित होते.