'लाडक्या बहिणी'चा राज्यातील पहिला निकाल, श्रीवर्धनमधून आदिती ठाकरे विजयी Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 7:52 am
Updated on
:
23 Nov 2024, 7:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होती. अंदाजे दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यातील पहिला निकाल हाती आला. रायगडमधील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी निर्णायक आघाडी मिळवत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या अनिल नवगणे यांना पराभवाच्या छायेत उभे केले आहे. राजेंद्र ठाकूर हे अपक्ष म्हणून रिंगणात होते, मात्र आदिती तटकरे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण ३६३ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यातील निवडणुकीत महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चेंजमेकर ठरली. विद्ममान आमदार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी X वर पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. ''महाराष्ट्रात पहिला निकाल लाडक्या बहिणीचा...'' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पक्षनिहाय महिलांची संख्या प्रत्येकी ३० आहे. महायुती (भाजप-१८, शिंदे शिवसेना-८, अजित पवार-४, १२ विद्यमान आमदार) तर महाविकास आघाडी (शरद पवार-११, काँग्रेस-९, ठाकरेंची शिवसेना-१०, २ विद्यमान आमदार )