लेबनॉन हल्ला ही तर झॉंकी आहे, नेतान्याहू यांचे स्वप्न ‘ग्रेटर इस्रायल’ बाकी आहे !

2 hours ago 1

हेजबोला प्रमुख हसन नसरल्लाह याची हत्या केल्यानंतरह इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा बदला संपलेला नाही. इस्रायलने हल्ले सुरुच ठेवले आहेत. एकामागोमाग टार्गेट उद्धवस्त केले जात आहेत. नेतान्याहू यांचा इरादा केवळ हेजबोला आणि हमास यांना नष्ट करणे नसून त्याहून अधिक त्यांनी योजना व्यापक असल्याचे स्पष्ट झालेले आहे. वास्तविक नेतान्याहू यांचे स्वप्न ‘ग्रेटर इस्रायल’ स्थापन करण्याचे आहे. यात केवळ गाझापट्टी नव्हेच तर अनेक मुस्लीम देश अडचणीत येणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर याची एक झलक दाखविली आहे. त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. अखेर हे ग्रेटर इस्रायल काय आहे ?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्‍याहू यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र संघात केलेल्या भाषणात एक मॅप दाखविल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. कारण या मॅपमध्ये पॅलेस्टाईनच्या वेस्ट बॅंक आणि गाझापट्टीला इस्रायलचाच भाग दाखविण्यात आला आहे. जर्मनीतील पॅलेस्टाईन अथोरिटीचे प्रतिनिधी लॅथ अराफे यांनी या संदर्भात एक्सवर एक पोस्ट लिहीलीआहे. नेतान्याहू यांनी खोटा मॅप दाखवून जगाची दिशाभूल केल्याचा आरोप अराफे यांनी केला आहे. हा एक प्रकारे युएनच्या मुलभूत सिद्धांताचाअपमान आहे. या मॅपमध्ये दाखविले आहे की कसा इस्रायल नदीपासून समुद्रापर्यंत पसरलेला आहे. त्यांनी पुढे लिहीलेय की या मॅपद्वारे इस्रायलने पॅलेस्टाईन आणि त्यांच्या नागरिकांनाच नाकारले आहे. हा एक नेतान्याहू यांची कुटील डाव असून अनेक लोकांनी त्यांच्या मॅपला बकवास म्हटले आहे.

अखेर संपूर्ण प्रकरण काय ?

नेतान्याहू यांनी आपल्या युएन येथील भाषणात दोन नकाशे दाखविले. पहीला नकाशा साल 1948 ची स्थिती दर्शवितो. यात तुम्ही पाहू शकता की इस्रायल संपूर्ण मिडल ईस्टमध्ये एकटा बाजूला आहे. त्याचे कोणतेही सहकारी दिसत नाहीत. केवळ इस्रायल हिरव्या रंगात दाखविला आहे. दुसरा मॅपमध्ये 2023 ची स्थिती दाखवित आहे. यात इस्रायल आणि सौदी अरब सह सात देश हिरव्या रंगात दाखवले आहेत. याचा उद्देश्य हे दर्शविणे आहे की आता या क्षेत्रात इस्रायलचे किती मित्र आहेत ? यात सौदी अरब देखील सामील आहे.

हंगामा का झाला ?

जेरुसेलम पोस्ट यांच्या अहवालानुसार नेतान्याहू ज्या नकाशाचा वापर केला आहे त्यात तो सर्व भाग दाखविला जो पॅलेस्टाईनच्या मते त्यांच्या राज्याची सीमा आहे. उदाहरणार्थ वेस्ट बॅंक, गाझा आणि पूर्व येरुसेलम ज्यांना नकाशात नेतान्याहू इस्रायलचा हिस्सा असल्याचा दावा करीत आहे. यातील दोन भाग आताही पॅलेस्टाईनच्या ताब्यात आहेत. तिसऱ्या भागावर इस्रायलच्या सैन्याचा ताबा आहे. अमेरिकन्स फॉर पीस नाऊचे सीईओ हैदर सुस्कींड यांनी एक्सवर पोस्ट करीत लिहीले की ग्रेटर इस्रायलचे नेतान्याहू यांचे स्वप्नं त्यांच्या भाषणातील सर्वात इमानदार भागा पैकी एक आहे.

काय आहे ग्रेटर इस्रायल?

ग्रेटर इस्रायलची कल्‍पना थियोडोर हर्जल ( begetter of Zionism Theodore Herzl  ) यांनी केली होती. यामुळे त्यास ज़ायोनी प्‍लान (Zionist Plan) म्हटले जाते. त्यांच्या मते ग्रेटर इस्रायल इजिप्तच्या फरात नदीपर्यंत पसरलेला आहे. यात संपूर्ण पॅलेस्टाईन. दक्षिण लेबनॉनपासून सिडोन आणि लिटानी नदीपर्यंत प्रदेश आहे. याशिवाय सिरीयाच्या गोलान हाईट्स, हौरान मैदान आणि डेरा, जॉर्डन आणि अकाबाची खाडी यात सामील आहे. याचा अर्थ संपूर्ण पॅलेस्टाईन इस्रायलचा हिस्सा होणार आहे. इतिहासकारांच्या मते नेतान्याहू हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी गाझापट्टीपासून लेबनॉनपर्यंत हल्ले करुन बेचिराख करीत आहे. त्यांना संपूर्ण पॅलेस्टाईनवर कब्जा करायचा आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article