ज्यांचं नशिब रातोरात बदललं असे जगात असंख्य लोक आहेत. कुणाच्या हाती खजाना लागतो तर कुणाला लॉटरी लागते. तर काही लोक आपल्या मेहनातीने पुढे येतात. नावलौकीक कमावतात. पैसा कमावतात. पण लॉटरीत लागलेला सर्वांचाच पैसा टिकतो असं नाही. काही लोकांना कोट्यवधीची लॉटरी लागते. पण दैव देतं आणि नशीब नेतं म्हणतात ना, तसं काहींच्या बाबत होतं. एका तरुणीच्या बाबतीतही असंच झालंय. तिला कोट्यवधीची लॉटरी लागली. पण ती नंतर भिकारी झाली. खायलाही पैसा राहिला नाही. जगायचं कसं अशीच भ्रांत तिला लागली आहे.
आज आम्ही तुम्हाला एक अशाच महिलेची गोष्ट सांगणार आहोत, तिने 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 2005 मध्ये 20 करोड रुपये जिंकले होते. तिचं नाव आहे लारा ग्रिफिथ्स. पण दुर्देवाने तिच्या आयुष्याची वाट लागली. आज ती आपल्या मुलीसोबत एकाकी आयुष्य जगत आहे. लारा सांगते की, ती आणि तिचा एक्स-हसबंड रोजर युनायटेड किंगडमच्या वेस्ट यॉर्कशायरमध्ये साधं आयुष्य जगत होते. त्याच वेळी तिने 1.8 मिलियन पाउंड (सुमारे 20 करोड रुपये) जिंकले.
परंतु, लारा ग्रिफिथ्सचा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. घराला आग लागली आणि नंतर तिने नवऱ्यापासून तलाक घेतल्यामुळे तिची सगळी संपत्ती नष्ट झाली. लारा म्हणते, “त्यावेळी मला खरंच माहित नव्हतं की या पैशांचा काय करावं? पैशांचं व्यवस्थापन कसं करायचं यावर रोजर आणि माझी कधी चर्चा झालीय असं आठवत नाही. त्या काळात आम्ही शानदार जीवन जगत होतो, पैसे उडवत होतो, जणू काही उद्या कधीही येणार नाही, अशा अर्विभावातच आम्ही जगत होतो. मी नोकरी सोडली आणि दुबई, फ्लोरिडा, फ्रान्ससारख्या आकर्षक ठिकाणी फिरायला गेले. त्यांनी 1.5 लाख पाउंड (सुमारे 1.6 करोड रुपये) किमतीचं एक ब्युटी सलून विकत घेतलं आणि 4.5 लाख पाउंड (सुमारे 4.8 करोड रुपये) किमतीचं आलिशान घर विकत घेतलं.
घराला आग लागली अन्
पण 2010 मध्ये मोठं संकट आलं, त्यांचं आलिशान घर जळून खाक झालं. लारा सांगते, “आमच्या घरात प्रचंड आग लागली होती. घर तीन दिवसांपर्यंत जळत राहिलं. आमची सर्व संपत्ती नष्ट झाली.” या आगीमुळे लारा आणि तिचं कुटुंब 8 महिने होटेल्समध्ये आणि तिच्या आईकडे राहत होते. या कालावधीत तिच्या घराची दुरुस्ती सुरू होती.
नवऱ्याशी घटस्फोट अन्…
मिररच्या रिपोर्टनुसार, 2011 मध्ये लारा आणि तिच्या कुटुंबाने आपलं घर परत मिळवलं, पण त्याच्या नंतरची स्थिती अजूनही वाईट होती. काही महिन्यानंतर रोजर आणि तिचा घटस्फोट झाला. त्या दोन वर्षांच्या काळात “अगदी नरकासारखी” स्थिती होती, असं ती म्हणते. तिचं हृदय तुटलं होतं पण मुलांचं पालनपोषण करायचं होतं. 2013 मध्ये तलाक होऊन लारा कंगाल झाली आणि तिला तिचं घर आणि सलून विकावं लागलं. लारा सांगते की, आग लागल्यामुळे तिच्या मुलीच्या मनावर मोठा परिणाम झाला, आणि ती अनेक वेळा बेचैन असायची. लारा स्वतःही आजारी होती, पण मुलांच्या काळजीसाठी तिने संघर्ष सोडला नाही.
मला हे आयुष्य…
आजही लारा आपल्या मुली रुबी (20 वर्षे) आणि किट्टी (17 वर्षे) यांच्यासोबत राहते. लॉटरी जिंकून सर्व संघर्षांचा सामना करूनही लारा म्हणते, “आता मला माझं जीवन आवडतं. हो, मी काही खूप कठीण काळातून गेले, पण मला त्याचं वाईट वाटत नाही.”
लारा आणि तिचा पती रोजर यांची भेट युनिव्हर्सिटीमध्ये झाली होती आणि 1997 मध्ये त्यांचा विवाह झाला. साध्या जीवनशैलीत राहत असतानाच, 2005 मध्ये त्यांना लॉटरीत 20 करोड रुपये जिंकले होते. त्या वेळी लारा एक शिक्षिका होती आणि रोजर आयटी व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तर त्यांची मुलगी रुबी एक लहान मुलगी होती. लारा त्या क्षणाची आठवण करत सांगते की, एका रात्री अचानक एक ईमेल आला ज्यामध्ये त्यांना 1.8 मिलियन पाउंड (20 करोड रुपये) मिळाल्याचं कळवण्यात आलं. त्यावेळी तिला वाटलं की हे एक घोटाळा असावा, पण राष्ट्रीय लॉटरीने त्यांच्या विजयाची पुष्टी केली आणि त्यांनी आपली कहाणी सार्वजनिक केली. पण, 20 करोड रुपये जिंकूनही, लारा आजही संघर्ष करत आहे आणि तिचं जीवन आता अधिक कष्टकारी आहे.