अहेरीत धर्मरावबाबा आत्राम विजयीPudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:09 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:09 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. विदर्भामध्ये सर्वाचे लक्ष लागून असलेल्या अहेरी मतदार संघातून धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यांनी 18 हजार 441 मतांनी भाग्यश्री आत्राम यांचा पराभव केला. धर्मरावबाब यांना एकूण 54 हजार 206 मते मिळाली. अहेरी मतदारसंघात भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी शरद पवार) आणि धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस) अशी लढत होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांच्या विशेष नजरा लागून होत्या. हा मतदारसंघ अनसुचित जातीसाठी राखीव आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांना विजय मिळाला होता.
आत्राम धर्मरायबाबा भगवंतराव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : 54206 मते (विजयी)
राजे अंबरिश राव राजे सत्यवानराव आत्राम - अपक्ष : 37392 मते
भाग्यश्री आत्राम - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार : 35765 मते