महाडहून भोरच्या दिशेला जाणारी कार पुण्यातील वरंधा घाटात दरीत कोसळली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. शुभम शिर्के असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात कशामुळे झाला, याबाबत माहिती मिळाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण पुण्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. अपघाताची माहिती मिळताच भोर पोलीस आणि सह्याद्री बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना दरीतून बाहेर काढून भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.