वर्ध्यात कराळे मास्तरांना मारहाण:बुथवर कशाला आलास म्हणत भाजपच्या कार्यकर्त्याकडून शिवीगाळ

2 days ago 1
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. अशात वर्ध्यात कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप कार्यकर्त्याने भर रस्त्यात कॉलर पकडून कराळे मास्तरांना मारहाण केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याकडून कराळे मास्तरांना अश्लील भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्यावरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले. बुथवर कशाला आलास असे म्हणत भाजप कार्यकर्त्याने भर रस्त्यात कराळे मास्तरांची कॉलर पकडून बुक्क्यांचा मार दिला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोन्ही गट आमने सामने आल्याने वातावरण तापले आहे. माहिती मिळताच सावंगी पोलिस घटनास्थळी झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. लोकसभेला तिकीट मिळण्यासाठी केले प्रयत्न कराळे मास्तर यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिक्षण आणि इतर सामाजिक मुद्यांवर नेहमी व्हिडीओ बनवत असतात. खास विदर्भाच्या शैलीतील भाषेमुळे कराळे मास्तर तरुणामध्ये लोकप्रिय आहे. नितेश कराळे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटासाठी प्रचार करत आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, त्यांना तिकीट मिळाले नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article