वसमतमध्ये शिष्याची राजकीय गुरूवर मात:माजी मंत्री दांडेगावकर पराभूत, विद्यमान आमदार राजेश नवघरे २९ हजार मतांनी विजयी

2 hours ago 1
वसमत विधानसभा मतदार संघात शिष्यानेच राजकिय गुरुवर मात करून एकहाती विजय मिळविला आहे. विद्यमान आमदार राजेश नवघरे यांनी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना २९ हजार मतांनी पराभूत केले. या निवडणुकीमुळे आता दोघांमधी वितुष्ट वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वसमत विधानसभा मतदार संघात माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे विद्यमान आमदार राजेश नवघरे यांचे राजकिय गुरु म्हणून ओळखले जातात. सन २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी मिळावी यासाठी दांडेगावकर यांनी माघार घेऊन नवघरे यांना निवडणुक रिंगणात उतरविले होते. त्यावेळी नवघरे यांनी विजय मिळविला. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार नवघरे यांनी अजित पवार गट जवळ केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजीमंत्री दांडेगावकर यांनी आमदार नवघरे यांच्या भुमीकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या निवडणुकीत नवघरे यांचा पराभव करण्यासाठी माजीमंत्री दांडेगावकर यांनी शरद पवार गटाकडून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकिय गुरु –शिष्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. या शिवाय राजकिय गुरु-शिष्यामध्ये अध्यात्मिक गुरु असलेले गुरु पादेश्‍वर शिवाचार्य महाराज यांनी निवडणुक रिंगणात उडी घेतली. त्यामुळे मतविभाजन अटळ झाले होेते. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वसमत येथे सभा घेतली होती. तर विद्यमान आमदार नवघरे यांनी जवळच्या कार्यकर्ते पदाधिकारी व नातेवाईकांना सोबत घेत प्रचार सुरु केला. यामध्ये त्यांनी बाहेरचा उमेदवार म्हणून दांडेगावकर यांचा उल्लेख केला तर आपण वसमत विधानसभेचे भुमीपुत्र असल्याचा प्रचार चालविला होता. या निवडणुकीत विद्यमान आमदार नवघरे यांनी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा २९ हजार मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे वसमत शहर वगळता संपूर्ण मतदार संघात नवघरे यांना आघाडी मिळाली आहे. आमदार नवघरे यांना १ लाख ५ हजारपेक्षा अधिक मतदान मिळाले तर दांडेगावकर यांना ७६ हजार पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. तर गुरु पादेश्‍वर महाराज यांना ३४ हजार पेक्षा अधिक मते मिळाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article