ही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत वस्त्रोद्योग समितीने गट अ, ब आणि क च्या विविध पदांसाठी भरती काढली आहे. यासाठी लगेच अर्ज करा. शुल्क, पात्रता, तसेच अर्ज कसा करायचा, याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत वस्त्रोद्योग समितीने गट अ, ब आणि क च्या विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीत उपसंचालक, सहाय्यक संचालक, गुणवत्ता हमी अधिकारी अशा अनेक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
या पदांमध्ये उपसंचालकाची दोन पदे, सहाय्यक संचालकाची 9 पदे, सांख्यिकी अधिकारी 1 पदे, गुणवत्ता हमी अधिकारी 15 पदे यांचा समावेश आहे. उमेदवार textilescommittee.nic.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात.
वस्त्रोद्योग मंत्रालय भरतीसाठी कोण करू शकतो अर्ज?
उपसंचालक आणि सहाय्यक संचालक पदासाठी उमेदवाराकडे फिजिक्स/केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. क्वॉलिटी अॅश्युरन्स ऑफिसर पदासाठी उमेदवारांकडे टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
स्टॅटिस्टिकल ऑफिसर, सीनियर आणि ज्युनिअर स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पदांसाठी उमेदवार गणित किंवा सांख्यिकी विषयातील पदवीधर असावा. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
वस्त्रोद्योग समिती गट अ, ब, क पदांसाठी वयोमर्यादा किती?
उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 35 वर्षादरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील (एससी/एसटी/ओबीसी) उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. उमेदवारांचे वय 31 जानेवारी 2025 च्या आधारे मोजले जाईल.
वस्त्रोद्योग समितीच्या अर्जांसाठी शुल्क किती?
पदांच्या आधारे अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. गट अ पदांसाठी अनारक्षित, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि ईएसएम प्रवर्गातील उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर या वर्गातील उमेदवारांना गट ब आणि क पदांसाठी 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील (एससी/एसटी) उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
वस्त्रोद्योग समिती भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
textilescommittee.nic.in जाऊन ‘करिअर’वर क्लिक करा. ‘ऑनलाइन अर्ज करा’ लिंकवर क्लिक करा आणि पुढे जा. आवश्यक तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा. अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट आऊट घ्या. वस्त्रोद्योग समिती भर्ती 2025 ची अधिकृत अधिसूचना
वस्त्रोद्योग समिती भरती 2025 अर्ज करा थेट लिंक
वस्त्रोद्योग समिती निवड प्रक्रिया कशी आहे?
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. गट अ पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. तर गट ब आणि क पदांसाठी निवड लेखी परीक्षेद्वारेच केली जाणार आहे. डेप्युटी डायरेक्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 67,770 ते 2,08,700 रुपये वेतन मिळेल.