जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते यांना झाले पुरस्कारांचे वितरण
उत्कृष्ट ध्वजनिधी संकलन (सन 2023-24) कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना सन्मानित करण्यात आले
केंद्र सरकारच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी केल्याबद्दल एक्सलन्स ॲडमिनिस्ट्रेशन या उपक्रमांतर्गत हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना Police medal for Distinguished service पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण विशेष अभियान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक 2024 जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
पोलीस आयुक्तालय, नाशिक येथील सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके, अंकुश चिंतामण यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्याकडून अतिउत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक 2024 जाहीर झाल्याबद्दल सन्मान
सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन येवला येथील उमेश बोरसे यांना उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी बद्दल केंद्रिय गृहमंत्री दक्षता पथक-2024 जाहीर झाल्याबद्दल सन्मान
वीरपत्नी मनीषा मोहिते यांना एन हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते ऑपरेशन स्नो लिओपार्ड लेह लडाख मध्ये कर्तव्य बजावत असतांना विरमरण आले त्यांचे शौर्यपदक त्यांच्या पत्नी मनीषा माहिते यांना 1 कोटी रूपयांचा धनादेश प्रदान
कर्नल राकेश माधव बिरार यांना भारतीय सैन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने सेना मेडल देवून सन्मानित केल्याने महाराष्ट्र शासनातर्फे रुपये 1 लाख 50 हजार रूपयांचा पुरस्कार
कर्नल विलास सोनवणे यांना सन 2023-24 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध योजनेतंर्गत पाच कोटी त्रेसष्ट हजार पाचशे सत्यात्तर इतक्या निधीचे वाटप तसेच जिल्ह्याला मागील वर्षी ध्वजनिधी संकलनासाठी रू 1 कोटी 38 लाख 67 हजार चे उद्दिष्ट देण्यात आले होते जिल्ह्याने रूपये 2 कोटी 17 लाख 48 हजार इतके उद्दीष्ट साध्य केले.
जस संवर्धनातनू जल समृद्धी वाटचाल या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिक च्या मिशन भागिरथ या संकल्पनेतून नरेगाअंतर्गत सिंमेंट बंधारे / केटी वेअर कामे मोहीम स्वरूपात एकूण 526 पैकी 327 कामे प्रत्यक्षपणे सुरू करून त्यापैकी 308 कामे पूर्ण करण्यात आल्याने जिल्हा परिषद नाशिकला राष्ट्रीय स्तरावर स्कॉच पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना सन्मानित करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गटातील मोडाळे ग्रामपंचायतीलस पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात मोहीम स्वरूपात 16 डिसेंबर 2024 पासून सुरू असून, त्याद्वारे शेतकरी त्यांच्या शेताची माहिती आधार क्रमांकाशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याचा ओळख क्रमांक (Farmers ID) तयार करण्यात येत आहेत. प्रातिनिधी स्वरूपात सहा शेतकऱ्यांना आयडी वाटप करण्यात आले. यात सुभाष पोपटराव देशमुख,आंबेबहुला, पंढरीनाथ कचरू चव्हाण, विल्होळी, राजराम कारभारी मते, शिंदे, सुरेश महादू चौधरी, पळसे, मनिष चंद्रकांत पवार, मोहगाव, विजय केरू आडके, नाणेगाव.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र
तृप्ती दत्तात्रय सोनवणे, पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्तालय,नाशिक
मनिषा सुरेश कांबळे, महिला पोलीस अमलदार, पोलीस आयुक्त
पुष्पा चंद्रकांत आरणे, सहा.पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण
विजया प्रकाश पवार, उप. निरिक्षक पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
समाजकल्याण कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभागातर्फे वीरपत्नी मनिषा संदिप मोहिते, कर्नल राकेश माधव बिरार, कर्नल विलास सोनवणे यांचा सत्कार
पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस ठाणे/ शहर वाहतूक शाखा/ इतर विभाग शाखा येथील बीट मार्शल कर्तव्य, 112 गस्त, समन्स, टपाल कर्तव्य करीता निकामीकरण झालेल्या वाहनांचे बदली सन 2024-25 मध्ये एकूण 62 होंडा शाईन, 125 सीसी गाड्यांचे वाटप करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी मिनी फायर अँण्ड रेसेक्यू व्हेईकल नगरपालिका / नगरपरिषद मनमाड, ओझर व सिन्नर यांना वाटप करण्यात आले.