Maharashtra Assembly Election|निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण
मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उमेदवारांची संख्या 28 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा 4,136 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तर 2019 मध्ये 3,239 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांपैकी 2,086 अपक्ष आहेत. बंडखोर उमेदवार 150 हून अधिक जागांवर रिंगणात आहेत, ज्यात महायुती आणि मविआ उमेदवार त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, 30 ऑक्टोबरपर्यंत नोंदणीकृत मतदारांची अद्ययावत संख्या 9,70,25,119 आहे. यामध्ये 5,00,22,739 पुरुष मतदार, 4,69,96,279 महिला मतदार आणि 6,101 ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश आहे. शिवाय, एकूण अपंग मतदारांची संख्या 6,41,425 आहे, तर सशस्त्र दलातील सेवा मतदारांची संख्या 1,16,170 आहे. यावेळी महाराष्ट्रात 1,00,186 मतदान केंद्रे असतील, तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची संख्या 96,654 होती. मतदारांची संख्या वाढल्याने ही वाढ करण्यात आली आहे. सुमारे सहा लाख राज्य सरकारी कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी तैनात असतील.