रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सामंत व राणे परिवारातील सख्ये भाऊ विधानसभेत दिसणार आहेत.Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 10:54 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:54 am
रत्नागिरी : एकाच कुटुंबातील वडील-मुलगा, वडील-मुलगी, सुन-सासरे राजकारणात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आणि पहिल्या आहेत. पण एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ राजकारणात आल्याचे आणि थेट विधानसभेचे आमदार झाल्याची घटना ऐकल्या आहेत का? या निवडणुकीत प्रथमच दोन सख्ये भाऊ आमदार झाल्याची घटना घडली आहे. रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गात सामंत व राणे परिवारातील सख्ये भाऊ आता विधानसभेत दिसणार आहेत. राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक तर अनेक ठिकाणी अपेक्षित निकाल लागला आहे. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत पहायला मिळाली. परंतु, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामंत आणि राणे यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण दोन सख्ये भाऊ निवडणुकीच्या मैदानात उभे होते.
रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांचे वर्चस्व आहे. उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा लढत होते. तर त्यांचे मोठे बंधू किरण सामंत हे प्रथमच राजापूर विधानसभा मतदार संघात उतरले होते. दोघेही महायुतीकडून लढत होते. विशेष म्हणजे उदय सामंत हे सलग पाचव्यांदा निवडून आले, हे अपेक्षित होते. परंतु, राजापूर मतदार संघात नवखे असलेले त्यांचे बंधू किरण सामंत हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले. त्यांनी विद्यमान आमदार राजन साळवी यांचा पराभव केला. यामुळे आता उदय व किरण हे दोन सख्ये भाऊ विधानसभेत दिसणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. नारायण राणे हे खासदार आहेत. तर नितेश राणे हे आमदार आहेत. त्यांचे मोठे बंधू निलेश राणे हेसुद्धा माजी खासदार राहिले आहेत. मात्र, या निवडणुकीत निलेश हे कुडाळ मतदारसंघातून तर नितेश हे कणकवली मतदारसंघातून रिंगणात होते. यामुळे या लढतीकडेसुद्धा लक्ष लागले होते. दोघेही विजयी झाल्याने आता हेसुद्धा विधानसभेत दिसणार आहेत.