विनोद तावडे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे; भाजपचा दावा

4 days ago 2

पुण्यात विनोद तावडेंनी पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर टीका केली. Pudhari Photo

Published on

19 Nov 2024, 11:47 am

Updated on

19 Nov 2024, 11:47 am

दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. ५ कोटी रुपये खिशात आणता येणार नाहीत. ते कोणी घेऊन जात असेल तर ते दिसून येईल. याबाबत त्यांनी पुरावे दाखवावेत आणि बिनबुडाचे आरोप करू नयेत. हॉटेलचे सीसीटीव्ही तपासावेत, आजूबाजूच्या भागात तपास करा, असे भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आज (दि.१९) पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय सचिव आहेत आणि पक्षाची अनेक कामे पाहत आहेत. नालासोपारा मतदारसंघातील उमेदवाराने त्यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. या बैठकीत कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रियेबाबत सूचना देण्यात येणार होत्या. त्यासाठी तावडे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान (Maharashtra Election 2024) पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांना बहुजन विकास आघाडीच्या (बाविआ) कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास घेरल्याची घटना घडली. त्यातून भाजप आणि बाविघा कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षीतिज ठाकूर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ उडाला.

विरार पूर्व भागात असलेल्या मनवेलपाडा येथील एका हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले. त्यातून बाविआचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात चांगली जुंपली. काही वेळातच आमदार क्षीतिज ठाकूरही तेथे पोहोचले.

दरम्यान, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर गुन्‍हा दाखल केल्‍याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.

#WATCH | Delhi: BJP MP and national spokesperson Sudhanshu Trivedi says, "In Maharashtra, a baseless allegation has been made as a last attempt by the MVA... Vinod Tawde is our National Secretary and is looking after several functions of the party... The candidate of the… pic.twitter.com/XJcpZzJ6fP

— ANI (@ANI) November 19, 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article