विवाह पंचमी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला. त्याला श्री राम विवाह उत्सव असेही म्हणतात यावर्षी विवाह पंचमी 6 डिसेंबरला शुक्रवारी आहे. सीता मातेचा स्वयंवर मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला झाला अशी पौराणिक मान्यता आहे. विवाह पंचमीला अयोध्या आणि जनकपुर मध्ये रामाची मिरवणूक काढली जाते. याशिवाय विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते. जाणून घेऊया विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा का केली जाते.
केळीचे झाड का मानले जाते शुभ?
घरामध्ये केळीचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते अशी पौराणिक मान्यता आहे. हे भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि बृहस्पतींशी संबंधित आहे. केळी हे भगवान विष्णूंचे आवडते झाड आहे असे मानले जाते. घराच्या अंगणात किंवा बागेत केळीचे झाड लावल्यास त्याचे शुभ फळ मिळते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी येते विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा करण्याचे महत्त्व
काही लोक विवाह पंचमीला आपल्या मुलींचे लग्न लावत नाही याचे कारण म्हणजे माता सीता आणि भगवान श्रीराम यांचे संघर्षमय वैवाहिक जीवन. पण दुसरीकडे अशीही एक धारणा आहे की विवाह पंचमीला माता सीता आणि भगवान श्री राम यांचा विशेष आशीर्वाद असतो. त्यामुळे काही खास उपाय करून विवाह पंचमीला वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.
विवाह पंचमीला केळीच्या झाडाचे महत्व
विवाह पंचमीला केळीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. देवतांचा गुरु बृहस्पती हा विवाह, संतती, धर्म यासारख्या बाबींसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्या लोकांच्या लग्नात अडथळे येत आहेत किंवा त्यांचे वैवाहिक जीवन चांगले जात नाही त्यांनी विवाह पंचमीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने जोडीदारासोबतचे नाते मधुर होते आणि गुरुच्या नकारात्मक प्रभावापासूनही मुक्ती मिळते.
केळीच्या झाडाची पूजा करण्याचा विधी
विवाह पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाला पिवळा दोरा बांधून हळद, चंदनाचा लावून फुले अर्पण करावेत. धूप आणि तुपाचा दिवा लावा आणि श्रीरामाच्या मंत्राचा जप करा. श्रीराम हे भगवान विष्णूंचे रूप आहे म्हणून केळीच्या झाडाची पूजा करताना लक्ष्मीनारायणाचे ध्यान करा. यानंतर अक्षदा, पंचामृत, सुपारी, लवंग, वेलची, दिवा अशा वस्तू अर्पण करा. यानंतर केळीच्या झाडाची 21 वेळा प्रदक्षिणा करा आणि केळीच्या झाडासमोर तुमची लग्नाशी संबंधित तुमची इच्छा सांगा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)