व्हॉट्सअ‍ॅपला भारतात झटका, 213 कोटींचा दंड, काय आहे संपूर्ण प्रकरण

4 days ago 2

Meta CEO Mark Zuckernberg Networth: फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया कंपनीची पेरेंट कंपनी मेटावर भारत सरकारने मोठी कारवाई केली आहे. भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे ( CCI ) मेटाला 213 कोटी रुपयांचा दंड ठोकला आहे. सीसीआयने हा दंड व्हॉट्सअ‍ॅपच्या 2021 मधील धोरणावरुन ठोकला आहे. त्या पॉलीसीनुसार व्हॉट्सअ‍ॅपने दबाव निर्माण करुन माहिती मिळवली होती. त्यानंतर ती माहिती इतर कंपन्यांना दिली होती. दरम्यान दुसरीकडे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. त्यांच्या कंपनीचे शेअर घसरले आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती 7.97 अब्ज डॉलरने कमी झाली आहे.

जानेवारी 2021 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने भारतीय युजरला आपल्या सेवा, अटी आणि गोपनीयतेबाबत अपडेट केले होते. त्यात म्हटले होते की, 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत युजरला व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग सुरु ठेवण्यासाठी काही माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे युजरकडे ती माहिती देण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. युजरने माहिती न दिल्यास त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल.

काय आहे आदेश

सरकारने व्हॉट्सअ‍ॅपवर मोठा दंड लावला आहे. सीसीआयने व्हॉट्सअ‍ॅपला निर्धारीत कालावधीत आदेशाची अंमलबजावणी करण्याचे म्हटले आहे. सीसीआयच्या निर्देशानुसार व्हॉट्सअ‍ॅप पुढील पाच वर्षांपर्यंत आपल्या प्लॅटफॉर्म एकत्र केलेला डेटा मेटा कंपनी किंवा इतर कंपनीच्या उत्पादकांना देणार नाही. भविष्यात हा डेटा दिला तर त्याबाबची माहिती युजरला दिली जावी. तसेच त्याचा डेटा कोणाकडे दिला आहे, हे युजरला कळवणे आवश्यक आहे. मेटा युजरसमोर कोणत्याही प्रकारची अट ठेवणार नाही. कंपनीची पॉलीसी मान्य करावी की नाही, त्याबाबतचे स्वातंत्र युजरकडे असणार आहे. भविष्यात कोणतेही अपडेट आले तरी युजरला ते मान्य करण्याचे बंधन राहणार नाही, असे सीसीआयने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

संपत्ती झाली कमी

मेटाचे कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. मेटाच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची संपत्ती घसरली आहे. त्यामुळे अब्जाधिशांच्या यादीतील त्यांचे स्थानही घसरले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article