शहरात पुन्हा एका तरुणाला भोसकले:विश्रांतीनगर भागातील घटना, आरोपींना अटक

3 hours ago 1
शहरातील बेगमपुरा भागात झालेल्या निर्घृण हत्याच्या घटनेने शहर हदरले आहे. ही घटना ताजी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून विश्रांतीनगर भागात आज बुधवारी एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. या खुनातील आरोपीला पोलिसांनी शोध घेऊन तात्काळ बेड्या ठोकल्या आहे. शहरात दोन दिवसापुर्वी टोळक्याने एका १७ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असताना विश्रांती नगर भागात सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास दोघांनी चाकूने अमोल संतोष दाभाडे (१९, रा. विश्रांतीनगर) हल्ला चढविला. या हल्ल्यात अमोल दाभाडे हा गंभीर जखमी झाला. हा हल्ला परिसरात राहणारे निलेश चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमोल दाभाडेला सोडून दोघांनी पळ काढला. याघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. कोळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के, पोलीस हवालदार विजय लकवाल यांनी धाव घेतली. जखमी अमोल दाभाडे यास नातेवाईकांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी निलेश चव्हाण व त्याच्या साथीदारांविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अमोल दाभाडेने केली होती मारहाण मयत अमोल दाभाडे व निलेश चव्हाण हे एकमेकांच्या ओळखीचे होते. काही दिवसापुर्वी आरोपी निलेश चव्हाण याने अमोल दाभाडे यांच्या मित्राच्या बहिणींची छेढ काढली होती. त्यामुळे अमोल दाभाडे याने निलेश चव्हाण यास मारहाण केली होती. तेव्हापासून दोघांमध्ये वाद होते. आज सकाळी अमोल दाभाडे हा नेहमीप्रमाणे देवदर्शनासाठी घराबाहेर पडला होता. यावेळी निलेश चव्हाण याने पाठलाग करून त्याच्यावर साथीदाराच्या मदतीने चाकू हल्ला केला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article