शहाद्यात भाजपा उमेदवार राजेश पाडवी 53 हजार 204 मतांनी विजयी
Published on
:
23 Nov 2024, 10:11 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:11 am
नंदुरबार - शहादा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार राजेश पाडवी यांनी ५३२०४ इतक्या भरघोस मतांची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे. येथे काँग्रेस उमेदवार राजेंद्र कृष्णराव गावित यांनी समोरासमोर त्यांना लढत दिली.
पोलीस दलाचा राजीनामा देऊन राजेश पाडवी यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि पहिल्यांदाच विधानसभेची उमेदवारी केली होती त्यावेळी शहादा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. या पहिल्या टर्म मध्येच त्यांनी केलेली विकास कामे आणि पक्षासाठी केलेले प्रयत्न यामुळे शहादा व तळोदा तालुक्यात त्यांचा चांगला संपर्क स्थापित झाला त्या बळावरच महायुतीने त्यांना या निवडणुकीत दुसऱ्यांदा उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात राजेंद्र कृष्णराव गावित यांनी काँग्रेस तर्फे उमेदवारी केली राजेंद्र गावित हे भाजपाचे प्रदेश सदस्य होते तथापि उमेदवारी मिळत असल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऐनवेळी भाजपातून आलेल्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिल्याच्या नाराजीतून काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्याचा परिणाम मतपेटीवर दिसला. घोषित निकालानुसार भाजपा उमेदवार राजेश पाडवी यांना 1 लाख 46 हजार 839 मते प्राप्त झाली. काँग्रेस उमेदवार राजेंद्रकुमार कृष्णराव गावित यांना 93 हजार 635 मतें मिळाली.