शाळांनी विद्यार्थ्यांसाठी तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी:शाळेला अहवाल पाठवण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना
2 hours ago
2
राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान ६ ते ७ तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने कार्यवाही केल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील. त्यानुसार सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा देण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहकाऱ्यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे. यानुसार शाळेमध्ये प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. आवश्यकतेनुसार शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी आठ आठवड्याच्या आत शासनास कार्य पूर्तता अहवाल सादर करावा तसेच प्रतिवर्षी जानेवारी ते जुलै महिन्यात याबाबतच्या अंमलबजावणीचा आढावा घेवून शासनास एकत्रित अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक अशा जवळपास ३६०० शाळा आहेत. जि.प. च्या एकूण ९१२ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या दिल्या आहेत सूचना {शाळेत आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात. { मुलांना तातडीने लागणारे वैद्यकीय सामान त्यात असावे. { वर्षात एकदा वैद्यकीय तपासणी शिबिर घ्यावे. तातडीने प्रथमोपचार देण्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. { रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावे. { विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास वाहन असावे. { विद्यार्थ्यांना तणाव मुक्तीसाठी कार्यशाळा घ्यावी. { विद्यार्थ्यांना समुपदेशकाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. { शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमावेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)