Published on
:
23 Nov 2024, 5:40 pm
Updated on
:
23 Nov 2024, 5:40 pm
शिरोली एमआयडीसी : पुलाची शिरोली ता . हातकणंगले माजी उपसरपंचाच्या दोन लक्झरी चार चाकी गाड्या पुर्व वैमनस्यातून फोडून ३ आरोपी फरार झाले असून यामध्ये पाच लाखाचे नुकसान झाले आहे . याबाबतची फिर्याद अभिजीत अनिल कोळी यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. यामध्ये विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी , अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी , अनिल माने उर्फ जॅकी (उपलब्ध) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी कि आरोपी विनायक लाड उर्फ कोळी, अनिकेत लाड उर्फ कोळी हे अभिजीत कोळी यांचे नातेवाईक असून त्यांच्या स्क्रॅप व्यवसाय व आर्थिक व्यवहारावरून पूर्वीपासून वाद सुरू आहे . शुक्रवारी सकाळी बारा वाजण्यासुमार विनायक लाड उर्फ कोळी , अनिकेत लाड उर्फ कोळी , व अनिल माने उर्फ जॅकी हे तिघे पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडी ( क्र. एम एच 09 ,0764 ) मधून माजी उपसरपंच कोळी यांची दारात लावलेली गाडी ( क्र. एम एच 09 एफ एल 0047) या गाडीचे समोरील व उजव्या बाजुच्या काचा एडक्याने फोडून पुढील बोनेटवर टोकदार हत्यार मारुन तेथील पत्रा फाडून व चेपुन अंदाजे तिन लाखाचे नुकसान केले. तर दुसरी गाडी ( क्र. एम एच 09 जे के 0047 ) या गाडीचे दोन्ही बाजूच्या व पाठीमागील काचा व आरसा फोडुन अंदाजे दोन दोन लाख रुपये नुकसान केले . घरावर दगडफेक करुन हातात एडका घेवून आजूबाजूला दहशत माजवून कोळी यांच्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी देवून फरार झाले .
विनायक कोळी याच्यावर नागांव येथे सातपुते गँगने जिवघेणा हल्ला केल्याने कोळी याने शुक्रवारी शिरोली पोलिसात सातपुतेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर आपल्याच नातेवाईकांच्या गाड्या फोडून दहशत माजवल्याने विनायक कोळी याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण करत आहेत .