शिर्डीत बोगस मतदान?:विखेंच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धुळ्याच्या मुलीचे लोणीत मतदान, प्रश्न विचारताच काढता पाय घेतला
3 days ago
2
शिर्डीतील लोणी येथे बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धुळ्यातील एका तरुणीने लोणी येथे मतदान केल्याचे समोर आले आहे. ही तरुणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्याचे माहिती आहे. या तरुणीला ओळखपत्रासह इतर कागदपत्रांबद्दल विचारणा केली असता तिने मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला. शिर्डी मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे या सहकाऱ्यांसह लोणीतील मतदार केंद्रावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथे एका तरुणीची विचारपूस केली. तुम्ही कुठल्या आहात असे विचारले असता तरुणीने पीएमसी असे उत्तर दिले. तिच्या उत्तरावर पीएमसी गावाचे नाही, असे घोगरे म्हटल्यानंतर तरुणीने लोणी असे उत्तर दिले. लोणी खुर्द की ब्रुदूक? असे प्रश्न घोगरेंच्या सहकाऱ्याने विचारल्याने तरुणी भांबावून गेली. त्यानंतर तुम्ही नेमक्या कुठच्या? असे घोगरेंनी विचारल्यानंतर, त्यावर धुळे असे उत्तर तरुणीने दिले. तुम्ही धुळ्याच्या आहात, तर मग इकडे मतदान कसे? इथे कॉलेजला आहे का? कोणत्या कॉलेजला? असे अनेक प्रश्न विचारल्याने तरुणी आणखीच गोंधळून गेली. तुम्हाला तुमच्या कॉलेजचे नाव पण माहीत नाही का? असे विचारले असता तिने प्रवरा मेडिकल असे उत्तर दिले. तर तिचे नाव विचारल्यावर ती स्नेहा डुल्ला असे नाव सांगितले. तुम्हा सगळ्यांनी कार्ड आली ना? किती विद्यार्थी आहेत? तुमचे नाव इकडे आहे आणि धुळ्यात पण आहे का? असे प्रश्न तरुणीला विचारण्यात आले. ते ऐकताच तरुणीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तिने तिथून हळूच पळ काढला. हे ही वाचा... बारामतीत बोगस मतदान, मतदान केंद्रावर दमदाटी:युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवारांचा आरोप, अजित पवारांकडून आरोपांचे खंडण राज्यातील हायव्होल्टेज बारामतील मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे. दमदाटी करून मतदान करून घेतले जात आहे. ते कुणाचे कार्यकर्ते होते माहिती नाही, पण नक्कीच घड्याळाचे होते हे मी सांगू शकते, असे शर्मिला पवार यांनी सांगितले. तर अजित पवार यांनी या आरोपांचे खंडण केले आहे. बारामतीत बोगस मतदान झाले नाही. तक्रारीमध्ये काही तथ्य असेल, तर काही अर्थ आहे. माझे पोलिंग एजंट धमकावण्याची भाषा करणार नाहीत, असे अजित पवार म्हणाले. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)