शेवाळा शिवारात दुचाकीवरून कालव्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू:पुलास कठडे नसल्याने चार महिन्यातील सहावा अपघात

14 hours ago 2
शेवाळा शिवारात दुचाकीवरून कालव्यात पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्याच्यावर सोमवारी ता. २७ सकाळी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. कालवाच्या पुलास कठडे नसल्यामुळे मागील चार महिन्यातील हा सहावा अपघात आहे. आखाडा बाळापूर ते शेवाळा मार्गावर शेवाळा शिवारातूून उर्ध्व पैैनगंगा प्रकल्पाचा कालवा आहे. या कालव्याच्या पुलावरून आखाडा बाळापूर, शेवाळा, देवजना, नेवरवाडी, कवडी या गावातील गावकऱ्यांना वाहतूक करावी लागते. मात्र या कालव्याच्या पुलावर कठडे नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील मोरवड येथील कैलास उर्फ हनुमंत आनंदराव बुरकुले (३२) हा तरुण त्याच्या दुचाकी वाहनावर देवजणा येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ते परत गावाकडे निघाला होता. मात्र शेवाळा शिवारातील कालव्याच्या पुलावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन दुचाकी घसरली. या अपघातात तो थेट कालव्यात जाऊन पडला. त्याच्या डोक्याला व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. सदर प्रकार काही गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जमादार रामदास ग्यादलवाड, शिवाजी पवार, राजीव जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिस व गावकऱ्यांनी कैलास उर्फ हनुमंत यास उपचारासाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. मयत कैलास उर्फ हनुमंत याच्या पार्थिवावर आज सकाळी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. दरम्यान, शेवाळा येथील कालव्याच्या पुलाचा रस्ता वळणाचा असून या ठिकाणी कठडे नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होत असून मागील चार महिन्यात सहा जणांनी आपला जिव गमावला आहे. आता तरी प्रशासनाने कठडे बसवावेत अशी मागणी होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article