पुढारी ऑनलाईन डेस्क - जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान"चा ग्रँड म्युझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला "संगीत मानापमान" हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी या चित्रपटासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत, या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी जसे शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे यांनी आपला आवाज दिला आहे.
"संगीत मानापमान" च्या या म्युझिक लॉन्च कार्यक्रमामध्ये स्टारकास्ट उपस्थित होते. गायकांनी लाईव्ह परफॉर्मन्स केला.
शंकर महादेवन म्हणाले, "१८ अविश्वसनीय प्रतिभावान गायकांसोबत काम करणं एक अद्भूत अनुभव आहे. मी याआधीही सुबोधच्या कट्यार काळजात घुसलीमध्ये संगीत दिलं असलं तरी या चित्रपटाच्या संगीतात नावीन्य आहे. समीर सामंत यांचे गीत खरोखरच खूपच रिफ्रेशिंग आहेत त्यामुळे खात्री आहे की, या संगीताच्या म्युझिकल प्रवासात प्रेक्षक नक्कीच मंत्रमुग्ध होतील आणि यासाठी मी संपूर्ण टीमचा खूप खूप आभारी आहे."*
अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले, "कट्यार काळजात घुसलीच्या यशानंतर आम्ही संगीत मानापमान सादर करत आहोत. जे महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. दिग्गज त्रिकूट शंकर-एहसान-लॉय व १८ गायकांनी सजलेल्या भावपूर्ण रचनांची जादू मोठ्या पद्यावर जादू मोठ्या पडद्यावर नक्कीच दिसेल. "
चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि उर्जा देशपांडे यांचे आहे. अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.