संत्रा उत्पादक अडचणीत:४.५०  लाख टन अंबिया बहाराच्या संत्र्यापैकी १ लाख टनाची विक्री होणे बाकी

2 hours ago 1
विदर्भातील १ लाख ६० हजार हेक्टरमधील संत्रा बागा उत्पादनक्षम आहेत. या बागांपासून दरवर्षी किमान ७.५० ते ८ लाख टन संत्र्याचे उत्पादन हाेत असून, यात सरासरी ४.५० लाख टन अंबिया आणि २.५० ते ३ लाख टन मृग बहाराच्या संत्र्याचा समावेश आहे. ६५ हजार हेक्टरवर आंबीया तर ४० ते ४५ हजार हेक्टरवर मृग बहाराचा संत्रा उत्पादन होते. आंबीया बहार ४.५० लाख टन उत्पादन होते. सप्टेंबरपासून १० ते २० रूपये किलो दर मिळाले. चांगल्या क्वालिटीचा संत्रा २५ रूपये किलोने गेला. ४.५० लाख टन अंबिया बहाराच्या संत्र्यापैकी तीन ते साडेतीन लाख टन विक्री झाली आहे. १ लाख टनाची विक्री हळुहळु सुरू आहे. विदर्भात दहा जिल्ह्यात संत्रा उत्पादन होते. संत्रा उत्पादनासाठी किलो मागे कमीतकमी २० ते २५ रूपये खर्च येतो. प्रत्यक्षात दर १५ हजार ते १८ रूपये मिळत आहे. राज्यात कोणाचेही सरकार आले तरी विदर्भ आणि संत्र्याकडे दुर्लक्ष होते असे श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. संत्रा उत्पादकांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे. निर्यात न करताही संत्र्यासाठी देशातंर्गत बाजारपेठ उपलब्ध आहे. सरकारने वाहतुकीचा प्रश्न सोडवल्यास संत्रा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल असे - महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. यापूर्वी पणन व कृषी विभागाने पुणे, मुंबई व नागपुरला संत्रा महोत्सव आयोजित केले होते. तसे ते परत घेण्याची गरज आहे. आंबीया बहाराचा संत्रा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून निघतो. आंबीया बहार डिसेंबरपर्यत चालतो. मृग बहार १५ जानेवारी ते १० एप्रिल पर्यत चालताे. मृग बहारातील संत्रा चव आणि आकाराला चांगला असतो असे ठाकरे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article