संन्यासाच्या वाटेवर:आता निवडणूक लढणार नाही - एकनाथ खडसे; मुलगी रोहिणीसाठी भावनिक साद

3 days ago 1
विधान परिषदेचे आमदार, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी मुक्ताईनगर येथून विधानसभा लढत आहे. तिच्यासाठी मते मागताना आ. खडसे म्हणाले की, आता यापुढे मी निवडणूक लढणार नाही. सहा महिन्यांपूर्वी भाजपतर्फे लाेकसभा लढणाऱ्या त्यांच्या स्नुषा रक्षा खडसेंसाठी मते मागताना खडसेंनी अशीच भावनिक साद घातली हाेती. २०१९ विधानसभेला भाजपने खडसेंऐवजी त्यांच्या कन्या राेहिणींना तिकीट दिले. परंतु त्यांचा त्यात पराभव झाल्याने खडसे राष्ट्रवादीत गेले हाेते. या वेळी शरद पवार गटाने राेहिणी यांना तिकीट दिले. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी लाेकसभेला भाजपनेे खडसेंच्या स्नुषा रक्षा यांना रावेरमधून उमेदवारी दिली हाेती. मग राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना एकनाथ खडसेंनी तब्येतीचे कारण देत उमेदवारीस नकार दिला. रक्षांसाठी प्रचार केला हाेता. प्रचारापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये आपण स्वगृही परतल्याचा आणि दिल्लीत पक्ष प्रवेश झाल्याचाही दावा केला हाेता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. त्यामुळे ते शरद पवार गटात राहिले. विरोधकांचा स्टंटबाजीचा आरोप लाेकसभा आणि विधानसभेवर घरातीलच दाेन उमेदवार असून ते स्वत: विधान परिषदेवर असल्याने त्यांना लढण्याची गरजच राहिली नाही. त्यामुळे रोहिणी खडसे यांच्यासाठी मते मागताना भावनिक आवाहन करणे हा आ. खडसेंचा राजकीय स्टंट असल्याचा आराेप विराेधकांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article