रोजच्या धकाधकीच्या कामातून काही दिवसांचा विसावा मिळावा आणि दूर डोंगर-दऱ्यांमध्ये जाऊन क्वॉलिटी टाईम घालवावा, असं प्रत्येकालाच वाटतं. पण, आता हे शक्य आहे. कारण, आम्ही तुमच्यासाठी अशा काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत, जिथे जाऊन तुन्ही आनंदी राहू शकाल.
धावपळीच्या जीवनातून विश्रांती घेऊन एखाद्या अतिशय सुंदर ठिकाणाचा शोध घेतल्यास तुमचा सर्व तणाव दूर होईल. तुम्हाला रिलॅक्स वाटेल. तज्ज्ञांच्या मते, प्रवास केल्याने तुमच्या मनाला प्रसन्न वाटतं. पण त्यासाठी योग्य ठिकाणी जाण्याचे नियोजन केले पाहिजे. चला जाणून घेऊया अशा काही ठिकाणांबद्दल जिथे तुमचे मन प्रसन्न राहील.
लडाख
लडाखला जायला तर कुणाला नाही आवडणार. तुम्हाला निसर्गाभोवती राहायला आवडत असेल तर लडाखसारख्या अतिशय सुंदर ठिकाणाचा शोध घेण्याचा प्लॅन करू शकता. लडाखचे सुंदर दृश्य कोणाचेही मन जिंकू शकते. या ठिकाणी काही दिवस घालवून तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो. विशेष म्हणजे याठिकाणी तुमचे मन प्रसन्न होऊ शकते. हे एक चांगले डेस्टिनेशन आहे.
हे सुद्धा वाचा
अंदमान-निकोबार बेट
अंदमान-निकोबार बेट हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंदमान-निकोबार बेटांवर फिरायला देखील जाऊ शकता. अंदमान-निकोबारदरम्यान हिरवळ, वनस्पती आणि प्राणी देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करतात. अंदमान-निकोबार बेट हे तुमच्यासाठी खास डेस्टिनेशन असू शकतं. त्यामुळे तुम्ही अंदमान-निकोबार बेट याचाही विचार करायला हरकत नाही.
ऋषिकेश
ऋषिकेशला जायला तर कुणाला नाही आवडणार. तुमच्या आयुष्यात खूप तणाव असेल तर तुम्ही ऋषिकेशला एक्सप्लोर करण्याचा प्लॅन ही करू शकता. या ठिकाणी तुम्हाला एक वेगळंच वातावरण जाणवेल. ऋषिकेश हे उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी गंगा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. इथला तुमचा अनुभव अविस्मरणीय असेल, इतकं मात्र निश्चित.
धर्मशाळा, हिमाचल प्रदेश
धर्मशाळा हे पण चांगलं डेस्टिनेशन आहे. तुम्हाला हवं असेल तर हिमाचल प्रदेशात असलेल्या अतिशय सुंदर धर्मशाळेलाही भेट देण्याचा प्लॅन करू शकता. धर्मशाळा हिरवळ आणि डोंगरांनी वेढलेली आहे. त्यामुळेच या ठिकाणी येऊन लोकांना भरपूर शांतता आणि विश्रांती मिळते. दलाई लामांच्या कथांशी निगडित हे ठिकाण भारतातील तिबेटी धर्म आणि संस्कृतीचे केंद्र आहे.
धकाधकीच्या कामातून काही दिवसांचा विसावा मिळावा आणि दूर डोंगर-दऱ्यांमध्ये जाऊन क्वॉलिटी टाईम घालवावा. वरील माहिती तुमच्या उपयोगात येऊ शकेल.